लेख कसा लिहावा ?

सर्वप्रथम ग्रामोद्धार या वेबपोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत !!!

ग्रामोद्धारवर लेख लिहताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

१) ग्रामोद्धारकड़े लेख सुपूर्त केल्यानंतर त्याच्या प्रकाशनाची जबाबदारी ही  ग्रामोद्धारची असेल.

२) लेख लिहताना शब्दांची संख्या मर्यादित असावी ( कमीत  कमी ७०० शब्द. )

३) सदर लेख हे कोणत्याही राजकीय हेतूने  तसेच कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील , समाजात द्वेष पसरवतील अशा  कोणत्याही गोष्टीने प्रेरित नसावी.

४) लेखातील मते ही लेखकाची स्वतः ची आसवीत आणि असतील ,त्यातील मताशी ग्रामोद्धार समूह सहमत असेलच असे नाही , लेखाची सर्व जबाबदारी ही सदर लेखकाची असेल.

आता........

ग्रामोद्धारवर लेख कसा लिहाल ? याबाबत थोडक्यात १० स्टेप्समध्ये  समजून घेऊया

१) सर्वप्रथम http://www.gramodhar.com/  लिंकवर जाऊन ग्रामोद्धार वर अकाउंट तयार करा.  

                   

        

     तुम्ही मोबाईल वापरत असाल तर डावीकडील कोपऱ्यात ऑप्शन वर क्लिक करा. आणि त्यावर Register वर क्लिक करुन आवश्यक माहिती भरा व Register करा. जर तुम्ही लैपटॉप वापरत असाल तर उजव्या कोपऱ्यात हा ऑप्शन असेल. आपण facebook किंवा  Google+ चा वापर करूनही Register करू शकता. 

 Login मध्ये तुम्ही रजिस्टर केलेला Email Id किंवा User Name वापरून लॉगिन करू शकता. 

२) ग्रामोद्धारच्या मुख्यपृष्ठावर तुमच्या नावाचे अकाउंट दिसेल , त्यावर क्लीक केल्यावर ४ पर्याय दिसतील  त्यात Admin Panel वर जा. पुढे तुम्ही Add Post  क्लिक केल्यानंतर त्या  पेजवर तुम्हाला लेख लिहता येईल.

३) Title मध्ये तुम्हाला लेखाचे भाषेनुसार संक्षिप्त नाव लिहायचे आहे.

४)  Slug  मध्ये लेखाचे नाव हे इंग्लिश मध्ये लिहायचे आहे. 

५) Summary & Description  मध्ये दोन_तीन ओळीत लेखाचा मायना लिहा, किंवा लेखाच्या सुरवातीच्या काही ओळी लिहा. 

६)  Keyword आणि Tag मध्ये महत्वाचे  Keywords लिहा,  ज्याचा लेखात उल्लेख असेल 

७) Content मध्ये तुमचा लेख लिहा. किंवा कॉपी आणि पेस्ट केला तरी चालेल. तुमच्या सोइनुसार त्यात Photos वापरू शकता. लेखात कोणत्याही वेबसाइटची लिंक नमुद करायची असल्यास , Conent मधील Insert  पर्याय  क्लिक करून येणाऱ्या पेज मध्ये तो URL or Link टाइप अथवा कॉपी पेस्ट करा. 

८) लेखाशी संबंधित महत्वाचा आणि जो लेख प्रकाशित झाल्यावर वरती लेखावर येईल  Photo इथे अपलोड करा.  तसेच काही फाइल्स असतील उदा.  pdf / docs / zip etc तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता 

९ ) वर्ग या भागात लेखानुरूप  Category  निवडा

१०) Add Post ऑप्शन वापरून लेख ग्रामोद्धार कड़े Submit करा. लेख ग्रामोद्धारकडून प्रकाशित केला जाईल. व तो ग्रामोद्धार पोर्टलवर प्रकाशित केल्यानंतर तुम्हाला त्याबाबतीत कळवले जाईल. तसेच लेखात ग्रामोद्धारच्या कोणत्याही नियमांचे उल्लघन होत असल्यास त्याबद्द्ल तुमच्याशी email द्वारे संपर्क केला जाईल. 

धन्यवाद !!!!

This site uses cookies. By continuing to browse the site you are agreeing to our use of cookies Find out more here