भिलवाडा पॅटर्न

देशभरातील प्रसारमाध्यमातून आजकाल सतत कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी एका पॅटर्न ची चर्चा फार जोशात रंगली आहे. काही प्रसारमाध्यमे आणि तंज्ञाकडून अशी मागणी केली जात आहे की 14 एप्रिल नंतर हा पॅटर्न संपूर्ण देशात लागू करावा.

भिलवाडा पॅटर्न

भिलवाडा पॅटर्न

               देशभरातील प्रसारमाध्यमातून आजकाल सतत कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी एका पॅटर्न ची चर्चा फार जोशात रंगली आहे. काही प्रसारमाध्यमे आणि तंज्ञाकडून अशी मागणी केली जात आहे की 14 एप्रिल नंतर हा पॅटर्न संपूर्ण देशात लागू करावा. या पॅटर्न चे नाव आहे " भिलवाडा पॅटर्न " .
प्रस्तुत लेखात भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी कशा प्रकारे झाली तसेच अंमलबजावणी करत असतानाची समीक्षा याबद्दल आपण उहापोह करूया. 
गेल्या महिन्यात 18 मार्च पासून राजस्थान मधील भिलवाडा जिल्हा कोरोना रुग्णांच्या व्यापक छायेखाली आला होता. सुरुवातीला या जिल्ह्यात एका खासगी वैद्यांना कोरोनाचा संसर्ग आढळून आला. आणि या खासगी वैद्याने अनगीनत रुग्णांची शुश्रूषा केल्यामुळे प्रशासनाची चांगली भंबेरी उडालेली दिसून येत होती. कारण त्यानंतर अवघ्या काही दिवसांत जिल्ह्यात किमान 25-30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान या काळात भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव कासावगतीने होत होता. त्यावेळेस राज्यात अवघ्या काही दिवसांतच इतके कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यास मोठा धक्काच बसला होता. व हे स्वाभाविकच आहे. 
पण असे म्हंटले जाते प्रशासनाचा गाढा हकताना राजकीय इच्छाशक्तीची सुद्धा जोड लागते. हे तारतम्य योग्य वेळी दाखविण्याचे कार्य केले ते राजस्थानचे मुख्यमंत्री श्री. अशोक गेहलोत यांनी. यासाठी राज्यातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांवर आपला विश्वास दाखवला. त्यातील एक म्हणजे राजस्थान राज्याचे आरोग्यसचिव श्री. रोहित सिंग आणि दुसरे म्हणजे भिलवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र भट होय. 
त्याचसोबत भिलवाडा प्रांत पूर्णपणे लॉकडाऊन करून बाकीच्या जिल्ह्यांशी असलेला त्यांचा संपर्क पूर्णपणे तोडून टाकला. 
जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र भट व आरोग्यसचिव श्री. रोहित सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारी पातळीवर प्रशासनातील १५०० तुकड्या तयार केल्या आणि त्यांना किमान प्रशिक्षण देऊन प्रत्येकाच्या घरोघरी पाठविले गेले.  ही पाहणी कोरोनाची नव्हती. तर सर्दी,ताप, खोकला या आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी होती. जसेजसे सर्दी, ताप,खोकला याचे रुग्ण सापडत गेले तसेतसे त्या व्यक्तींना स्थानबद्धतेचा आदेश बजावला गेला. यानंतर या व्यक्तींचे दररोज दोन वेळा अन्य सरकारी तुकडीचे सदस्य हे त्या व्यक्तीच्या घरात जाऊन संबंधित रुग्णांच्या सर्व लक्षणांची नोंद करून घेत. हे सर्व हाताळण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. ३ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील २,१४,६४७ इतक्या घरांची पाहणी केली. आणि जिल्ह्यातील सर्व नागरिक मिळून लोकसंख्या होते ती २८ लाखांहून अधिक आहे. या सर्व नागरिकांमध्ये सर्दी , तापाने आजारी असलेल्यांची संख्या १४,००० च्या आसपास आहे. अशा व्यक्तींना वेगळे केले आणि आणि त्यांच्या लक्षणांचा दिवसांतून दोन वेळा आढावा घेतला गेला. वरील व्यक्तींचे वय, त्यांनी जर कुठे प्रवास केला असेल तर त्याचा इतिहास, त्यांची सर्वसाधारण आरोग्यव्यवस्था असा तपशील गोळा केला जात होता. यामागे अनावश्यक चाचण्या टाळल्या जाव्यात हा हेतू होता. या पाहणी अंतर्गत फक्त २८१६ व्यक्तींच्याच कोरोना चाचण्या कराव्या लागल्या. त्याचसोबत सर्दी, तापाच्या रुग्णांवर लक्ष असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यामुळे अशा व्यक्ती या प्रकृतीने बऱ्या असल्याचा निष्कर्ष काढला गेला. व तो योग्य होता. कारण त्या व्यक्तींच्या प्रकृती सुधारणेमध्ये विलगिकरण तसेच सर्दी, खोकला यांवरील औषधांचा मोठा वाटा होता. त्यानंतर २७ नव्या रुग्णांना या साथीची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. 
तसेच या २७ रुग्णांना ज्या इमारती मध्ये ठेवण्यात आले होते तो परिसर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आला.  
त्यासोबतच वरील २७ रुग्ण ज्या व्यकींच्या संपर्कात आले होते त्यांना सुद्धा निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. जिल्ह्यातील खाजगी / सरकारी संस्था, हॉटेल्स,वसतिगृहे ताब्यात घेऊन तब्बल ११,६५९ बिछान्याची सोय केली गेली. 
आणि खासगी रुग्णालयामध्ये आणिबाणीच्या परिस्थितीसाठी विलगिकरण कक्ष तयार करण्यात आले. या इतक्या युद्धजन्य परिस्थितीच्या तयारीनंतर ही राजस्थान जिल्ह्यात २ रुग्णांचा प्राण गेला. तर आनंदाची बातमी म्हणजे गेल्या 6 दिवसांपासून जिल्ह्यात एक सुदधा नवा कोरोना रुग्ण आढळून आला नाही. 
देशपातळीवर भिलवाडा पॅटर्न राबविण्यात यावा यासाठी लॉकडाऊन नंतर विविध राज्यांना याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव यांनी आवाहन केले. 
देशपातळीवर १४ एप्रिलच्या लॉकडाऊन नंतर राबविण्यात येणारा प्लान हा नेमका कसा असेल ???
● राज्यसरकारच्या देखरेखीखाली एखादा विशिष्ठ कोरोनाबाधित रुग्णांचा भौगोलिक प्रदेश वेगळा केला जाईल. 
● त्या प्रदेशातील केसेस आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर नजर ठेवली जाऊ शकते. थोडक्यात त्या व्यक्तींना विलगिकरण कक्षात ठेवले जाईल. 
● या भागामध्ये सरकारी तसेच खाजगी जागेवर विलगिकरण कक्षाची निर्मिती केली जाईल. तसेच सरकारी व खाजगी रुग्णालयालामध्ये अतिरिक्त बेड (खाटा) तसेच कोरोनाविरुद्ध लागणारी उपकरणे यांची उपलब्धता केली जाऊ शकते. 
● विशेष करून ज्या भागामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे अशा भागाची पूर्णपणे नाकाबंदी करण्यात येईल आणि ही नाकेबंदी अत्यंत काटेकोरपणे पाळली जाऊ शकते. 
महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वांवर वरळी कोळीवाडा, धारावी, सांगली येथे राबविण्यात आलेले प्रारूप हे ' मिनी भिलवाडा' म्हणूज समजले जाऊ शकते. 
वरील प्रारूपामुळे टेस्टिंग आणि ड्रेसिंग या दोन आयुधांमार्फत कोरोना नियंत्रणात आणला जाऊ शकतो. 
वरील पद्धतीमार्फत २००९ साली स्वाईन फ्लू ची साथ नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश प्राप्त झाले होते.


Click Here To See More

What's Your Reaction?

like
2
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0