कोण आहे कोरोना विषाणूच्या विरोधात लढणारा मराठमोळा योध्दा ?

वैभवशाली इतिहास ज्या मातीत घडला अन् आताही घडतोय त्याच महाराष्ट्राच्या नांदेड़मधील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले देशातील उच्चपदावर काम करतं आहेत.

कोण आहे कोरोना विषाणूच्या विरोधात लढणारा मराठमोळा योध्दा ?

आज १ मे , महाराष्ट्र दिनानिम्मिताने देशात आणि महाराष्ट्रात घवघवीत कामगिरी करणाऱ्या आणि त्यात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या एका मराठमोळ्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती घेणार आहोत.

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने ११ फेब्रूवारी २०२० या दिवशी कोरोनाला जागतिक महामारी घोषित केली. त्या दिवसांपासून आजपर्यंत ८० दिवस पूर्ण झाले आहेत. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तो ३० जानेवारी २०२० या दिवशी , म्हणजेच भारतानेही याबाबतीत ९० दिवस पूर्ण केले आहेत. तरि जगात अजुनही कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध झाली नाहिये. आणि या दिसत नसणाऱ्या शत्रूने दोन जागतिक युद्ध करणाऱ्या अमेरिका, ब्रिटन, स्पेन व इटलीसारखे देशांना ही अक्षरशः भुईसपाट केले आहेत. चीनच्या तोडिस तोड़ लोकसंख्या असताना १३५ कोटींचा भारत भक्कमपणे ह्या संकटाचा मुकाबला करतोय. यात सुरूवातीपासून भारताने उचललेल्या उपाययोजनामध्ये  लॉकडाऊनसारखा धाडसी निर्णयांत एका मराठमोळ्या मावळ्याची भूमिका खरोखरच निर्णायक ठरत आहे.
याच कोरोना योद्धात आपण २४ × ७ काम करणाऱ्या डॉक्टर्सला योद्धे म्हणणार असू तर ते मराठमोळे नाव म्हणजेच डॉ. रमण गंगाखेड़कर हे ह्या  कोरोनाविरुद्ध युद्धातील सेनापती म्हणून फ्रंट लाइनवर काम करतं आहेत.

PIB म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो , केंद्र सरकार कडून रोज संध्याकाळी ४.०० वाजता गृहमंत्रालय , आरोग्यखाते आणि ICMR यांच्याकडून कोविडबद्दलची तयारी आणि आद्यावत आकडेवारी आणि सध्याची परिस्थिति अन् पुढील उपाययोजना याबाबत खुलासा केला जातो. याच माध्यमांमध्ये एक मराठी नाव सातत्याने झळकताना दिसत आहे.  आणि ते नाव म्हणजेच कोरोना संक्रमणापासून देशाला वाचविण्यासाठी मेडिकल रिसर्चमध्ये फ्रंट लाइनवर कार्यरत असणारे डॉ. रमण गंगाखेडकर. अतिशय शांतपणे उत्तरे देणारे , बोलण्यात मुंबईवाली हिंदी अन् बोलताना अधुनमधुन मराठी शब्द नकळत बाहेर पडले की हे मराठमोळे व्यक्तिमत्व जवळचे वाटतात अगदी आजोबांसारखेच

भारतात मेडिकल रिसर्चमध्ये अग्रभागी असणारी ICMR म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद संस्था.देशातील विविध आजारांवरील संशोधन व त्यांच्या तपासण्यांचे प्रोटोकॉल ठरवणाऱ्या ह्या संस्थेतील साथी आणि ससंर्गजन्य रोग विभागात डॉ रमण गंगाखेड़कर कार्यरत आहे.

वैभवशाली इतिहास ज्या मातीत घडला अन् आताही घडतोय त्याच महाराष्ट्राच्या नांदेड़मधील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले डॉ. रमण आज देशातील उच्चपदावर काम करतं आहेत.

सन १९५९ मध्ये मुंबईला रमण यांचा जन्म झाला. रमण यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील जिल्हा परिषदेच्या झाले. लहानपणापासुनच अतिशय  कुशाग्र बुद्धि आणि अभ्यासू विद्यार्थी होते.
दहावीच्या परिक्षेत रमण चांगल्या गुणासाहित गुणवत्ता यादीत आले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी नांदेड़मधील धर्माबादच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात पूर्ण केले. आणि यातही रमण यांनी आपले नंबर मध्ये येणे सोड़ले नाही.
रमण यांनी आपण डॉक्टर व्हायचे स्वप्न डोक्यात ठेवून मन लावून अभ्यास करायचे . डॉक्टर होण्यासाठी त्यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आपले MBBS चे शिक्षण पूर्ण केले
रमण आता डॉ रमण झाले होते. काही दिवसांनी डॉ रमण यांनी पदव्युत्तरसाठी तयारी सुरु केली आणि  ‘पिडियाट्रीक्स’ मधून आपले एम डी पूर्ण केले.

डॉ रमण हे देशासहित जागतिक पातळीवर प्रकाश झोतात आले ते आपल्या पुण्यात एका महत्वाच्या विषयातील संशोधनाबद्दल. सन १९९५-९६ मध्ये डॉ रमण पुण्यातील गाडीखाना रुग्णालयात कार्यरत होते.दरम्यानच्या काळात ‘महिलांवरील एड्सचा संसर्ग’ यावरील त्यांच्या शोधनिबंध प्रकाशित झाला. त्याच दशकात जागतिक पातळीवर एडसचे  नावाच्या रोगाने थैमान घातले होते. आणि याच एड्सविरोधात जागतिक पातळीवर एड्स प्रतिबंधक कार्यप्रणाली विकसित करण्यामध्ये डॉ रमण यांच्या संशोधनाने मोलाचे योगदान दिले.‘आईकडून मुलाला होणारे एड्सचे संक्रमण’ ह्या विषयावरील संशोधनाने डॉ. रमण गंगाखेडकर हे मराठमोळे नाव संपूर्ण जगात , माध्यांमामध्ये अभिमानाने घेतले जावू लागले.

आपल्या मिळालेल्या यशात अजुन काही संशोधनाच्या पाऊल खुणा उमटवण्यासाठी साथ आणि संसर्गजन्य रोगांवरील अभ्यासासाठी  अमेरिकेती प्रसिद्ध असणाऱ्या जॉन्स हापकीन इन्स्टिट्यूट मध्ये डॉ. रमण गंगाखेड़कर यांनी ‘मास्टर इन पब्लिक हेल्थ’ ही पदवी संपादन केली.
भारतात परतल्यानंतर NIN म्हणजेच नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रेशन या संस्थेत शनल ब्यूरो म्हणून काही वेळ काम केले. पुढे IHA म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन अनॉटामी मध्ये काम करत डॉ रमण ICMR मध्ये उच्चपदावर पोहचले

कोविड १९ च्या लॉकडाऊनच्या दोन्ही कालावधीमध्ये डॉ रमण गंगाखेड़कर आणि त्यांच्या टीमचे काम कौतुकास्पद आहे.भारतातील सर्व राज्यांना टेस्टिंग प्रोटोकॉल ठरवून देणे.
टेस्टिंगबद्दल मार्गदर्शन करणे. कोरोना टेस्टिंगसाठी लँब तयार करणे. राज्यांना त्याबाबत परवानगी , मार्गदर्शन करणे. कोविडच्या प्रसाराबाबत जागरूकता , आवश्यक उपाययोजना , मेडिकल , डॉक्टर , नर्सेस यांच्यासाठी नियमावली तयार करणे. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी घ्यावयाची काळजी , नियम याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे. अत्यावश्यक पिड टेस्टिंग कीट व प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी प्रयत्न करणे यासारखे विविध फ्रंटवर डॉ. रमण लढत आहेत.

दररोज माध्यमांना सामोरे जाताना शास्त्रीय भाषेला सहजसोप्या भाषेत सांगण्याची कला , आकडेवारी व अगदी कोरोनासारखे मोठे संकट याबाबत मुद्दे स्पष्ट करताना जनमाणसाला आश्वस्त करणारे भाषा कौशल्य यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांत भारताचा हा मराठमोळा चेहरा माझ्यासाठी अन् आपल्या सर्वासाठीच प्रेरणादायी आणि अभिमान बाळगणारा आहे.

डॉ रमण गंगाखेड़कर यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल  यावर्षीच्या पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांची निवड सार्थ ठरते.२५ जानेवारी २०२० रोजी डॉ. रमण गंगाखेड़कर यांना एड्स व संसर्गजन्य आजारांवरील योगदानासाठी भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरवण्यात आले.

डॉ रमण गंगाखेड़कर यांचे आणि ICMR च्या टिमचे कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील योगदानाबद्दल टीम ग्रामोद्धार कडून ख़ुप ख़ुप धन्यवाद !!!

We Proud Of You Dr Raman Gangakhedakar.

धन्यवाद. !

छायाचित्र आंतरजालावरून साभार !!!

What's Your Reaction?

like
6
dislike
0
love
2
funny
0
angry
0
sad
0
wow
4