उन्नतीचा मूलमंत्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उन्नतीचा मूलमंत्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उन्नतीचा मूलमंत्र 

आधुनिक लोकशाहीच्या युगामध्ये समाजाने वेळीच जागृत होऊन आपला योग्य मार्ग सुधारला नाही तर आणखी कित्येक शतके ते दुसऱ्याकडून तुडवले जाऊन कोणत्या रसातळाला जातील हे एक त्या विधात्यालाच माहीत ! अशा भयंकर आपत्तीपासून बचाव करून घेण्याकरिता, आजचा हा आमचा संदेश सर्व तरुण बहिस्कृतांस आरोळी देऊन सांगत आहे की, हे बहिष्कृत गणलेल्या तरुणा, तू या अज्ञानरूपी निद्रेला सोडून, प्रथमतः मी कोण आहे म्हणजे माझे खरे स्वरूप काय आहे? माझा सभोवारच्या निसर्ग सिद्ध परिस्थितीशी काय संबंध आहे? या सृष्टीच्या सूत्रधारकाने मला कशाकरीता उत्पन्न केले? त्याचा मानस काय असावा? व हल्ली माझी काय स्थिती आहे व पुढे काय होणार? याचा विलंब न लाविता, आताच विचार करून आपल्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी, आपला नित्यश: होत असलेला अपमान तजण्यासाठी तयार  हो !

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज संपूर्ण देशामध्ये ऑनलाईन पद्धतीने साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचां हा दिवस आपल्या सर्वांसाठीच प्रेरणा देणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कामगार, या क्षेत्रात केलेली कामगिरी अजोड आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय शेती आणि शेतकरी यांच्या विषयी मूलभूत चिंतन केले आहे. त्यांचे विचार आजही प्रासंगिक असून त्यातूनच त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. बाबासाहेब जर समजून घ्यायचे असतील, अंगिकारायचे असतील तर त्यांनी निर्माण केलेल्या साहित्य      वाचनाशिवाय पर्याय नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचे आणि भाषणाचे महाराष्ट्र शासनाने संपादित केलेले खंड, आणि बाबासाहेबांचं इतर मौलिक साहित्य टीम ग्रामोद्धार http://velivada.com यांच्या सहकार्याने आपल्यासोबत शेअर करीत आहे. 

विचारांचा हा समृद्ध वारसा आपण सर्वांसोबत शेअर कराल या आशेसह सर्व वाचकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!! 

बाबासाहेबांचे मौलिक साहित्य pdf स्वरुपात मिळवण्यासाठी खालील दुव्याला भेट द्या !! 
 

[PDF] Dr Babasaheb Ambedkar's Books in Marathi - Velivada

Click here 

What's Your Reaction?

like
6
dislike
0
love
3
funny
0
angry
0
sad
0
wow
1