एकटं असणं तिला आवडतं

एकटं असणं तिला आवडतं

मनाच्या डोहात काहीतरी खुपतं

सतत काहीतरी सलत राहतं

पण अल्लड कल्पनेत स्वतःला रमवून

चेहर्‍यावर नकळत सुख उमटतं

म्हणुन एकटं असणं तिला आवडतं

काळजी नसते कसलीच 

आणि स्वप्नात रंगून जाता येतं

 सत्यात होऊ शकत नसलेल्या 

खोट्या जगात हरवून जाता येतं

म्हणुन एकटं असणं तिला आवडतं

अलवार मंद वारा वाहत राहतो 

मनातल्या वादळांना वाट मोकळी करतो 

उदासीनता बाजूला सारून 

हसू चेहर्‍यावर उमलतं

म्हणुन एकटं असणं तिला आवडतं

निष्पर्ण झाडावर चैत्र पालवी फुटते 

कोकिळा ही मग तिच्याशी साद घालू पाहते 

नव्याने मोकळा श्वास घेऊन 

स्वतःला शांत करता येतं

खरंच एकटं असणं तिला खूप काही देऊन जातं

- कांचन अशोक टाकसाळे 

What's Your Reaction?

like
10
dislike
0
love
6
funny
0
angry
0
sad
0
wow
3