ज्येष्ठ सुधारणावादी नेते व मराठी साहित्यिक हमीद दलवाई यांचा आज स्मृतिदिन...

ज्येष्ठ सुधारणावादी नेते व मराठी साहित्यिक हमीद दलवाई यांचा आज स्मृतिदिन...

ज्येष्ठ सुधारणावादी नेते व मराठी साहित्यिक हमीद दलवाई यांचा आज स्मृतिदिन...

हमीद दलवाई लेखकापेक्षा सुधारक म्हणूनच तसे जास्त प्रसिद्ध. एखादा माणूस फक्त पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध जातो ते पण हा माणूस हातात सुधारणेची जळती मशाल घेऊन पोहत होता. तीही धर्म सुधारणेची. अल्पायुषी ठरल्यामुळे पूर्ण प्रवाह पार नाही करू शकला पण किमान इतर अनेक मशाली मात्र त्यांनी पेटवल्या.

हमीद ह्यांच्या ललित लेखनात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील समाजाचे जास्त दर्शन होते. त्यांच्या "इंधन" ह्या कादंबरीत कोकणातील एका खेड्याचे जीवन रेखाटले आहे. एकेकाळी गुण्यागोविंदाने रहाणारे गाव काही धर्मांध लोकांमुळे कसं बिघडतं ह्याचं चित्रण ह्यात येते. 

हमीद यांनी इतर लेखकांच्या तुलनेत लेखन इतकं नाही केलं. पण जितकं लेखन केलं, जितकी व्याख्यानं दिली आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांनी जे कार्य केलं त्याने फक्त मुस्लीम समाजाला नाही तर इतरांना देखील दिशा देण्याचं एक काम या केलं नि देशाच्या पुरोगामित्वातील महाराष्ट्राचा वारसा तसाच चालू ठेवला.

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या ह्या थोर सुपुत्रास ग्रामोध्दार समूहाकडून विनम्र अभिवादन...

What's Your Reaction?

like
1
dislike
0
love
1
funny
0
angry
0
sad
0
wow
1