कोविड-१९चा इतिहास : भाग १

आज मि लिहतोय तो मार्च महीना संपत आलाय. २०१९ मध्ये आलेल्या कोरोना वायरसने मागील चार महिन्यात  संपूर्ण जग व्यापून घेतले आहे. 

कोविड-१९चा इतिहास : भाग १

आज मि लिहतोय तो मार्च महीना संपत आलाय. २०१९ मध्ये आलेल्या कोरोना वायरसने मागील चार महिन्यात  संपूर्ण जग व्यापून घेतले आहे. 

आजच्या या लेखात आपण  कोरोना वायरसची सुरवात कोठे  झाली ? कधी झाली ? या अगोदर अशा  प्रकारच्या कोणत्या वायरस धुमाकूळ घातला होता ? याचा आढावा घेणार आहोत. 

Here's how the coronavirus quarantine of Wuhan, one of China's ...

२०१९ वर्षाच्या सरतेशेवटी....

चीन  या देशातील हूबे प्रांताची राजधानी असलेले  वुहान  शहर , जवळपास १ कोटि १० लाख लोकसंख्या .याच  वुहानमध्ये  कोरोना आजाराची सुरवात झाली. सुरवातीला तेथील डॉक्टर / स्पेशलिस्ट यांना हा न्यूमोनिया ब  सारखा आजार  वाटला. त्याची  साधारणपणे लक्षणे ही ताप -सर्दी -खोकला, हात-पाय दुखने अशी होती. तेव्हा काही  व्यक्तीच्या छातीचा  एक्स रे नॉर्मल  नव्हता. पण छातीच्या  एक्स रे मध्ये एक गोष्ट  समोर आली इन्फ्लुएंजाचे  केलेले परीक्षण आणि इतर वायरसचे केलेले परिक्षण , यामध्ये तफावत दिसून आली आणि हीच लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्येत वाढ दिसून आली  , त्यांच्यामध्ये ही  ह्याच आजाराचा प्रकार आढळून आला. 

चीनच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना अशा प्रकारची लक्षणे असणारा  पहिला रुग्ण मागील वर्षाच्या ८ डिसेंबर रोजी सापडला आणि अनेक लोकाना या रोगाची लागण जलद गतीने झाली. संक्रमकांची छोटी असणारी संख्या झपाट्याने वाढत गेली. असे म्हंटले जाते की सुरवातीचे दोन रुग्ण हे वुहानमधील हुआनान मासे  ( सी  फ़ूड ) बाजारात कामाला होते.  या सगळ्या गोष्टी तेव्हा समोर आल्या  , जेव्हा पहिल्या रुग्णाचा मृत्यु झाला.  ९ जानेवारी  २०२० ला नोवेल कोरोना वायरसमुळे एक ६१ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यु झाला , जो  या मासे  बाजाराचा नेहमीचा ग्राहक होता. 

सुरवातीला काही अभ्यासानंतर असे समजले की , त्यांच्याकडे जेवढे रुग्ण  त्यातील जास्तीत जास्त रुग्ण हे त्या बाजार व आजूबाजूच्या परिसराशी निगडित होते. आणि त्यांचा जास्तीत जास्त संपर्क हा  वन्यप्राण्यांशी  होता. जिथे त्याचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत असे. पुढे जावून अजुन एक शक्यता समोर आली की , हा वायरस एका वन्यजीवांच्या प्रजाती मधून दुसऱ्या प्रजाती मध्ये पसरत गेला. पण नेमक्या कोणत्या प्राण्यांमध्ये हा वायरस पसरला हे समोर आले नाहीये. कारण या बाजारातील प्राण्यांना ठेवण्याची व्यवस्था अतिशय किचकट होती. सर्वाना एकाच पिंजऱ्यांत ठेवले जात असे  मग पुढे हेच संक्रमण प्राणी -प्राणी - मानव प्रजाती मध्ये झाले. 

COVID-19 infection: origin, transmission, and characteristics of ...

जेव्हा हा  वायरस भेटला , तेव्हा चिनने हा सार्स असल्याचे नाकारले होते ,जो २००२ मध्ये आलेला गंभीर श्वसन रोग होता. त्यानंतर झालेल्या परीक्षणानंतर समोर आले की , या रोगाचा उद्रेक कोरोना वायरसमुळे झाला. ज्याची आणि सार्स  ची जवळपास ७६ % गुणसूत्रे सारखी होती. फक्त फरक हाच होता की हा  सार्सपेक्षा कमी प्राणघातक होता. पण अतिशय संसर्गजन्य असून त्याचा प्रसार वेगाने होतो. जर  बाधित झालेल्या एका रुग्णाचा विचार केला तर त्याच्यामागे  साधारणपणे ३ ते ४ जण  बाधित झालेले असाव्यात. कदाचित ही संख्या जास्तदेखील असू शकते . २०१९ च कोरोना विषाणु हा सार्स पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे , कारण तो अगदी सहज आपल्यामध्ये पसरतो आणि आजारी करतो. आपण संपर्कात आल्याने किंवा जवळ बोलण्याने प्रसार होण्याची भिति वाटत असते जी सार्स मध्ये नव्हती.

सार्समध्ये काही गोष्टी या खुप वेगळ्या होत्या. ज्यात जर रुग्ण आजारी पड़ला आणि त्याला सार्सची लक्षणे दिसून आली .  त्याने जर सात दिवसाच्या आत उपचार घेतले तर त्याचा प्रसार रोखण्यात यश येत होते.  पण २०१९ चा कोरोना वायरस हा  ह्यापेक्षा वेगळा आहे. अगदी साधारण दिसणाऱ्या , स्वस्थ वाटणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील तो भेटु  शकतो. चिनच्या आरोग्य विभागाने हे मान्य केले होते की , एखादा रुग्ण दिसायला सामन्य वाटत असला तरी  तो या रोगाचा प्रसार करू शकतो. आणि आपल्याला त्यासाठी ७ दिवस थांबायची आवश्यकता नाहीये . जेव्हा त्याला लक्षणे दिसु लागतील , त्या दिवसापासून त्याचा प्रसार चालू होतो. व अतिशय जलदरित्या पसरतो.  हे अतिशय चिंताजनक आहे.

              

कोरोना वायरस काही प्राण्यांच्या प्रजातीमध्ये सापडतो , जसे की ऊंट , गुरे , सिवेट मांजरी आणि वटवाघुळ.  कधी  कधी  या विषाणुचे रूपांतर होऊन तो प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो. आणि जेव्हा ह्या वायरसचे योग्य पर्यवसन त्या व्यक्तीच्या शरीरात होते. आणि  मग त्या वायरसचा प्रसार दोन  व्यक्तीमध्ये होतो.अशाच प्रकारचा प्रसार हा २००२ मध्ये  आलेल्या  सार्सच्या बाबतीत सिद्ध झाले होते तसेच २०१२ मध्ये आलेल्या मर्स या वायरस बाबतीत हि स्पष्ट झाले. त्यामुळे नेमका २०१९चा कोरोना वायरस हा  कोणत्या प्राणी संसर्गामुळे झालाय हे समजायला वेळ लागेल. सार्सच्या बाबतीत हा कालावधी साधारणपणे १० महीने असा  होता. कोरोना  २०१९चा उगम समजण्यासाठी अजुन काही काळ जाण्याची शक्यता आहे. तेव्हाही  हे उघडकीस आले होते की,  सध्या बंद असलेले वुहानचे सी फ़ूड मार्केट  हे बेकायदेशीर व्यापार व विचित्र वन्यजीवांच्या सेवनाचे एक केंद्र बनलेले होते.

आता सध्या हा  वायरस मजबूत होत आहे आणि त्यापासून संक्रमित होणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यासाठी आपल्या सर्वांना मानसिक तयारी करायला हवी.  सरकार आपल्या पातळीवर कल्पनेपेक्षा जास्त प्रयत्न करत आहे. गरज आहे ती  आपल्या मदतीची. सरकार कडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे योग्य पालन करा. २१ दिवस लॉकडाउनची  आवश्यकता सरकारला वाटली आहे. तो पाळा 

पुढील लेखात आपण  बघणार आहोत की चीनची रणनीति काय होती ? तसेच जागतिक आरोग्य संघटना यात कोठे होती ? आणि यापुढे आपण  यातून कोणता धड़ा यातून घेणार आहोत ?

 तो पर्यंत धन्यवाद !!

Sources  :    साउथ चीन मॉर्निंग पोस्ट अहवाल : https://www.scmp.com/topics/coronavirus-outbreak

                     अलजजीरा पोर्टल : https://www.aljazeera.com/news/2020/01/timeline-china-coronavirus-spread-200126061554884.html

              आणि इतर  कोरोना संबंधित विडिओज .

   

What's Your Reaction?

like
6
dislike
0
love
2
funny
0
angry
0
sad
0
wow
3