चक्रिवादळाचं बारसं कसं होते आणि कोण करते  ?

तो अतिशय वेगात येऊन गेला , सोबत पाऊसही घेऊन आला होता. अन् जाताना काही भागातले जनजीवन विसकटुन गेला ही , झाड़े- विजेचे खांब पडझड झाली. अन्न-पाणी-निवारासहित सगळ्या सोयसुविधाची घड़ी मोडली गेली. आज आठवडयाहुन अधिक वेळ होत आला पण परिस्थिति आजही तशीच आहे म्हणुनच म्हणायला काल-परवा पर्यंत येऊन गेलेला.

चक्रिवादळाचं बारसं कसं होते आणि कोण करते  ?

तो अतिशय वेगात येऊन गेला , सोबत पाऊसही घेऊन आला होता. अन् जाताना काही भागातले जनजीवन विसकटुन गेला ही , झाड़े- विजेचे खांब पडझड झाली. अन्न-पाणी-निवारासहित सगळ्या सोयसुविधाची घड़ी मोडली गेली. आज आठवडयाहुन अधिक वेळ होत आला पण परिस्थिति आजही तशीच आहे म्हणुनच म्हणायला काल-परवा पर्यंत येऊन गेलेला.
निसर्ग नाव होते त्या भयानक चक्रिवादळाचं.

चक्रिवादळ म्हणजे नेमके क़ाय रे , भाऊ ?

समुद्रात कमी दाबाच्या प्रदेशाभोवती जेव्हा चारही बाजुनी वारे वाहण्यास सुरवात होते. कमी दाब , उष्ण तापमान आणि आर्द्र हवामान यामुळे त्या भागात वाफ निर्माण होऊन चक्रिवादळ निर्माण होतात. 

चक्रिवादळाचे बारसं कसे होते ?

आतापर्यंत आलेल्या चक्रिवादळाचा सर्वाधिक वेग साधारणपणे २८० किमी प्रति तास इतका होता.
पण फक्त ६५ किमी प्रति तासापेक्षा जास्त वेग असणाऱ्या वादळांचेच नामकरण केले जाते. 

चक्रिवादळाना याअगोदर गावांची नावे दिली जात असे. मग महिलांची नावे दिली गेली जसे की निशा , नीलम , आलिया , रश्मी , लैला इत्यादि जसे आज काही नद्यांची नावे आज ही महिलांच्या नावावरुन दिली गेली आहेत.
पुढे काही महिला संघटनानी आक्षेप घेतल्या नंतर वादळाला महिलांची नावे देणे बंद केले गेले अन् त्यांना पुरूषाची व इतर नावे देण्याची सुरवात झाली.

बारशाला येणारे अन् नाव ठेवणारे पाहुणे कोण असतात ?

भारताचा समावेश उत्तर हिंदी महासगार झोन मध्ये होतो.
यात भारतासह बांग्लादेश , पाकिस्तान , म्यानमार , श्रीलंका , थाइलैंड , ओमान , मालदीव यासारख्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर लगतच्या १३ देशांचा समावेश होतो. १३ देशांकडून प्रति देश १३ अशी एकूण १६९ नावांची यादी तयार केली जाते. आणि ही यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून प्रसिद्ध केली जाते.

A B C D ...Z या इंग्रजी अक्षरमालिकेनुसार १३ देशांची क्रमवारी लावली जाते. आणि त्या त्या देशानी सूचवलेली नावे रकान्यात लिहली जातात. एक रकाना संपला की दूसरा रकान्यातील नावे अन् मग क्रमाने आलेली नावे क्रमवारीनुसार चक्रिवादळाला दिली जातात.

( उदाहरणासाठी सोबत देश व काही नावाची यादी फ़ोटो )

भारताने कोणती नावे आपल्या यादीत दिली आहेत ?

प्रत्येक देशाने १३ नावे दिली आहे , भारताचा विचार केल्यास या यादीत गती , तेज , मुरासु , आग , व्योम , झोर , प्रोबोहो, नीर , प्रभंजन , घुरनी , अंबुड , जलाधि आणि वेग.

निसर्ग चक्रिवादळाला "निसर्ग" हे नाव बांग्लादेशने दिले होते.

इतर देशात वादळाला कोणत्या नावाने ओळखतात ?

◆ चीनचा समुद्र आणि पैसिफिक महासागर : टायफून
◆ वेस्ट इंडीज बेट व कैरिबियन बेट : हुरिकन
◆ गयाना बेट आणि वेस्ट अफ्रीका : टॉरनेडो
◆ नॉर्थ वेस्ट ऑस्ट्रेलिया : विली विली
◆ भारतीय महासागर : साइक्लोन 

पण चक्रिवादळाला नाव का देतात ?

मानवी विकासात प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला जातो. समुद्रातील घड़णाऱ्या प्रत्येक हालचालीचा अभ्यास केला जातो ,त्यात चक्रिवादळाचा सुद्धा अभ्यास केला जातो.
सतत होणाऱ्या हालचालीमुळे एकापेक्षा अधिक वादळ निर्माण झाल्यास प्रत्येक वादळ स्वतंत्र्यपणे ओळखता यावे म्हणून नावं दिली जातात.

धन्यवाद !! 

© सागर आव्हाड.

What's Your Reaction?

like
8
dislike
1
love
4
funny
1
angry
0
sad
0
wow
5