कळत नाही.... का?

कळत नाही.... का?

कळत नाही....! का?

पण बोलता येत नाही

शब्द आहेत, विचार आहेत

पण मांडता येत नाही

कळत नाही....! का?

पण मनातली तगमग थांबत नाही 

भावनांचा कल्लोळ माजलाय 

तरीही व्यक्त होता येत नाही 

कळत नाही....! का?

मन शांत होत नाही 

दाटून येतात अश्रू 

पण मोकळं होता येत नाही

कळत नाही....! का?

राग.. लोभ... काही काही नाही

काहीतरी चुकतंय इतकंच

पण शोधता येत नाही

कळत नाही....! का?

का सलतय मनात काही

खंत उरलीये आता फक्त 

पण व्यक्तच करता येत नाही 

 - कांचन 

What's Your Reaction?

like
19
dislike
0
love
9
funny
0
angry
-1
sad
0
wow
9