थोडं जगून बघ.... !

थोडं जगून बघ.... !

सुंदर स्वप्नात रमून, उंच झेप घेऊन बघ 
स्वच्छंदी पक्षी होऊन तु, उंच भरारी घेऊन बघ 

रोज नवी खोटी आशा, घोर निराशा गाडून बघ 
निरागस डोळ्यांतील अश्रू पुसून, स्वतः साठी हसून बघ

सुखाच्या वाटा शोधून, दुःखाच्या लाटा.. विसरून बघ 
हवेतील हळुवार झुळूक होऊन, मोकळा श्वास घेऊन बघ

प्रत्येक क्षण येणारा, कळी प्रमाणे खुलवून बघ 
दुसर्‍या साठी जगता जगता, स्वतः साठी जगून बघ 

आयुष्याच्या वाटेवरचं, प्रत्येक पान उघडून बघ 
चिंता काळजी... सारं सोडून, तुझी कहाणी लिहून बघ 

कालची आणि उद्याची, भीती सारी विसरून बघ
अल्लड लहान मुल होऊन, आज थोडं जगून बघ 

-कांचन अशोक टाकसाळे

छायाचित्र आंतरजालावरून साभार 

What's Your Reaction?

like
8
dislike
0
love
6
funny
0
angry
0
sad
0
wow
6