" एखादे वेळी मी माझ्या बापाचे नाव बदलीन; पण या कॉलेज ला दिलेले शिवाजी राजांचे नाव बदलणार नाही. "

पाखिफुट्या पाखरांसाठी | पवित्र असा वटवृक्ष रोविला | जो वस्तीला आला त्याला | ताटामधला घास दिला || लोकांना वारसाने संपत्ती मिळते आपल्या पिढीला वारसा हक्काने भाऊराव मिळाले.

" एखादे वेळी मी माझ्या बापाचे नाव बदलीन; पण या कॉलेज ला दिलेले शिवाजी राजांचे नाव बदलणार नाही. "

भाऊराव हे अत्यंत स्वाभिमानी होते. विद्यार्थी देखील स्वाभिमानी निपजले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. विद्यार्थ्यांनी कोणापुढे लाचार होऊ नये, स्वतःच्या श्रमावर पाहिजे ते साध्य करावे आपला स्वाभिमान कधीही सोडू नये. स्वाभिमान गहाण न टाकता शिक्षण पूर्ण करावे. जगात प्रतिष्टेने जगावे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

" अरे देवाने तुम्हाला दोन हात दिले आहेत. धडधाकट प्रकृती दिली आहे. काम करा, घाम गाळा, व त्याच्या मोबदल्यात कॉलेजचे शिक्षण घ्या. " श्रमाचे महत्व सांगताना भाऊराव विद्यार्थ्यांना म्हणतात, " मुलांनो स्वतः ला गरीब समजू नका. तुम्ही तुमच्या वडिलांच्या पैशावर शिकत नाही तर स्वत:च्या सामर्थ्यावर शिकता. तुम्ही फी देत नाही, पण फी पेक्षा जास्त श्रमाच्या रूपाने देता. शिक्षण पूर्ण झाल्यावरही श्रमाची प्रतिष्ठा जपा." 

थोडक्यात विद्यार्थ्यांनी कष्ट करून स्वत:च्या हिंमतीवर शिक्षण घ्यावे, त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नये असे विचार अण्णांनी मांडले.शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करावी. तसेच आर्थिक स्वावलंबन निर्माण व्हावे हा विचार ' कमवा आणि शिका ' या योजने मागील आहे.

खेड्या पाड्यातील गरीब शेतकरी व कामगार यांच्याकडे मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी पैसे नव्हते. त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून भाऊराव पाटील यांनी ' कमवा आणि शिका ' ही अभिनव योजना सुरू केली. संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भाऊरावांनी शेतात काम करणे, विहीर खोदणे, खडी फोडणे अशी कामे दिली. या श्रमाच्या मोबदल्यात त्यांच्या शिक्षणाची व निवासाची सोय केली. अण्णांनी या योजनेतून विद्यार्थ्यांच्या मनावर स्वावलंबनाचे व श्रमाचे संस्कार केले. शिक्षणासाठी इतरांकडे हात पसरन्यापेक्षा स्वतः घाम गाळून शिक्षण पूर्ण करण्याचा धडा भाऊरावांनी या योजनेच्या माध्यमातून दिला. ' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे त्यांनी आपल्या संस्थेचे घोषवाक्य ठेवले. अण्णांच्या ' कमवा आणि शिका ' या योजनेचे अनुकरण राज्यातील अनेक शिक्षण संस्थांनी केल्यामुळे आज हजारो गरीब आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना आपले शिक्षण घेता येत आहे.

ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी सारखा जगप्रसिद्ध स्वराज्य संस्थापक निपजला त्या महाराष्ट्रात नवध्येयाने प्रेरित झालेले हे पहिलेच महाविद्यालय निघणार असल्याने सदर महाविद्यालय त्यांच्या स्मरणार्थ काढण्याचे नक्की केले असून त्यास छ्त्रपती शिवाजी कॉलेज, सातारा असे नाव देण्याचे योजिले आहे. आमची खात्री आहे व आम्हाला दृढ आशा आहे की , सदर महाविद्यालयातून त्यागी, ध्येयवादी व कर्तृत्ववान रयत सेवक निर्माण होतील. 
( रयत शिक्षण संस्था अहवाल, १९६६ - ६९ , पृ. ७० -७१)

हे पत्रक खान्देशच्या एका मारवाडी धनिकाच्या पाहण्यात आले. त्यांनी आपले नाव महाविद्यालयाला दिल्यास रू. दोन लाख देण्याचे आमिष दाखवले. भाऊरावांनी सांगितले, " एखादे वेळी मी माझ्या बापाचे नाव बदलीन; पण या कॉलेज ला दिलेले शिवाजी राजांचे नाव बदलणार नाही. "

........

कर्मवीर भाऊराव पाटील काल आणि कर्तृत्व हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर भेट द्या....

https://archive.org/download/in.ernet.dli.2015.448826/2015.448826.Karmvir-Bhaurao.pdf

What's Your Reaction?

like
6
dislike
0
love
1
funny
0
angry
0
sad
0
wow
1