कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र जोतिबांच्या मार्गांनी जाऊ...

कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र जोतिबांच्या मार्गांनी जाऊ...

कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र जोतिबांच्या मार्गांनी जाऊ..

२८ ऑक्टोबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या हीरक महोत्सवानिमित्त मुंबई येथे एक मोठा सत्कार करण्यात आला होता. त्या सत्काराला उत्तर देताना बाबासाहेबांनी सांगितले की, माझे आयुष्य तीन गुरु      ( बुद्ध , संत कबीर, आणि फुले) आणि तीन उपास्यदैवतानी (विद्या, स्वाभिमान आणि शील) घडवले आहे. त्यांनी बुद्धाला पहिले आणि श्रेष्ठ गुरु मानले. त्यांचे दुसरे गुरु कबीर आणि तिसरे गुरु म्हणजे जोतीराव फुले होय. 

बाबासाहेब म्हणतात की, माझे तिसरे गुरु म्हणजे जोतीराव फुले होत. ब्राम्हणेतरांचे  खरे गुरु तेच होत. शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मागं, चांभार यांना माणुसकीचे धडे फुले यांनीच दिले आणि शिकवले. पूर्वीच्या राजकारणात आम्ही जोतिबांच्या मार्गानेच जात होतो... कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र जोतिबांच्या मार्गांनी जाऊ...

वर्ण व जातीभेद लक्षात घेऊन अशा विषमता धिष्टीत   समाजव्यवस्थेवर प्रखर हल्ला महात्मा फुले यांनी चढविला. वर्ण व जाती व्यवस्थेवर आधारलेली समाजव्यवस्था ही खालच्या वर्ण व जातीच्या लोकांवर अन्याय करणारी व्यवस्था आहे. ही व्यवस्था शोषणावर आधारित आहे. याची जाणीव फुले यांना झाली होती. महात्मा फुले यांनी भारतीय समाजातील विषमता अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, धर्मांधता इ. गोष्टींचा कडाडून विरोध केला. देशात धर्माच्या आधारावर अशी गुलामी जोपासण्यात आली आहे याचे अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण ' गुलामगिरी' या ग्रंथात जोतीराव फुले यांनी केले. विशेष म्हणजे हा ग्रंथ युनायटेड स्टेट्सच्या सदाचारी लोकांना गुलामांस दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कार्यात औदार्य, निरपेक्षता व परोपकार बुध्दी दाखवली यास्तव, त्यांच्या सन्मानार्थ हा ग्रंथ जोतीराव फुले यांनी त्यांना अर्पण केला होता. या अर्पण पत्रिकेत फुले म्हणतात की, ' माझे देशबांधव त्यांच्या या स्तुत्य कृत्याचा कित्ता, आपल्या शूद्र बंधावास ब्राम्हण लोकांच्या दास्यत्वापासून  मुक्त करण्याच्या कामी घेतील, अशी आशा बाळगतो.'

जोतीराव फुले यांनी देशातील शूद्र, अतिशूद्र, आणि महिलांना कसे गुलाम मानण्यात आले, त्यांचे कसे अमानवीय पद्धतीने शोषण केले जाते, येथील शेतकरी वर्गाचे कसे धर्माच्या आधारावर प्रचंड शोषण केले जाते याबाबतचे सविस्तर विश्लेषण केले आहे. सामाजिक गुलामगिरी आणि विषमतेतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाशिवाय प्रगती नाही असा विचार करून त्यांनी शूद्र, अतिशूद्र आणि महिलांकरिता शाळा सुरू केल्या. शिक्षण घेण्याचा अधिकार ज्यांना नाकारण्यात आला होता त्यांना शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करून भारतीय समाजात क्रांतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती. अस्पृश्यता निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, स्त्री - पुरुष समाज, अनिष्ट रूढीपरंपरांना विरोध अशाप्रकारचे सामाजिक क्रांतीचे कार्य त्यांनी हाती घेतले. सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३ मध्ये त्यांनी केली. महात्मा फुले यांनी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके आणि पुस्तिका प्रसिद्ध केल्या. ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा आदी पुस्तके त्यांनी लिहली.

संदर्भ : लोकराज्य, एप्रिल २०१७

महात्मा जोतीराव फुले यांचे निवडक साहित्य व महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित  साहित्य वाचण्यासाठी खालील दुव्यावर भेट द्या... 

महात्मा फुले : व्यक्तित्व आणि विचार    

शेतकऱ्यांचा आसुड , गुलामगिरी , ब्राम्हणांचे कसब

What's Your Reaction?

like
9
dislike
1
love
2
funny
1
angry
0
sad
0
wow
1