सुख- दुःख

सुख- दुःख

माझं आणि सुखाचं फारस काही जमत नाही 

मी त्याला बोलवत नाही... आणि तेही स्वतःहून येत नाही 

आनंदाच्या बँकेत माझं काही खातं नाही 

भावनां पेक्षा जास्त, मला व्यवहार, हिशेब आवडत नाही.. 

म्हणूनच माझं आणि सुखाचं फारस गणित जुळत नाही 

मी त्याला बोलवत नाही... आणि तेही स्वतःहून येत नाही 

एकट वाटू देत नाही दुःख कधी... सावलीसारखं साथ देत 

सुख येत पाहुण्या सारखं आणि पुढच्या क्षणी सोडून जातं, 

म्हणुनच कदाचित माझ आणि सुखाचं फारस जवळच नातं नाही 

मी त्याला बोलवत नाही... आणि तेही स्वतःहून येत नाही 

आनंद आणि सुखाची कमी मला जाणवत नाही 

हवहवस वाटल तरी मृगजळाने तहान कधीच भागत नाही

म्हणुनच माझी आणि सुखाची फारशी भेटही होत नाही 

मी त्याला बोलवत नाही... आणि तेही स्वतःहून येत नाही

कितीही असलं दुःख जरी... परक मुळीच वाटत नाही 

कारण सुख बोचायला लागलं की माणसात माणुसकी रहात नाही

म्हणुनच माझं आणि सुखाचं फारस काही पटत नाही 

मी त्याला बोलवत नाही... आणि तेही स्वतःहून येत नाही 

- कांचन

What's Your Reaction?

like
12
dislike
0
love
9
funny
0
angry
0
sad
2
wow
4