अभ्यास ते अधिकारी

पुस्तक परीचायामुळे लोकांपर्यंत छान पुस्तकं पोहोचतात. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी याची नक्कीच मदत होते.

अभ्यास ते अधिकारी

पुस्तक परिचय      

पुस्तक परीचायामुळे लोकांपर्यंत छान पुस्तकं पोहोचतात. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी याची नक्कीच मदत होते.

याचमुळे अस एखाद पुस्तक जे वाचून तुम्हाला मार्गदर्शन मिळाव, आणि तुम्हाला तुमच्या ध्येय्याकडे पोहोचण्यासाठी  वाट सापडावी, अस वाटल! पण नुसत मार्गदर्शन म्हणजे सल्ला नाही, तर अनुभवातून आलेलं शहाणपण ! म्हणूनच  या पुस्तक परिचयात अस एक पुस्तक जे तुमच्यासाठी  उत्तम मार्गदर्शक ठरेल.लेखक मनोहर भोळे लिखित.. MPSC अभ्यास ते अधिकारी …One Step Solution !

मनोहर भोळे ! राजमुद्रा, अटेन्शन Please आणि अभ्यास ते अधिकारी या सर्वसामान्यांनी गौरवलेल्या प्रेरणादायी पुस्तकांचे लेखक !

खुद हि को कर बुलंद इतना

कि हर तकदीर लिखने से पहले   

खुदा बंदे से पुछे कि                 

बता तेरी राजा क्या है

 

विद्यार्थ्यांनी स्वतः ला अभ्यासाबाबतीत एवढ तयार कराव कि पद त्यांच्याकडे चालत याव ....!

प्रत्यक्ष भेटू न शकणाऱ्या पण स्पर्धा परीक्षांत यशाचे स्वप्न मनाशी बाळगणाऱ्या सर्व इच्छुकांच्या अभ्यासाला मदतीचा हातभार लागावा यासाठी हा पुस्तक प्रपंच केल्याच लेखक सांगतात. MPSC ची जराही माहिती नसलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सहजपणे अभ्यास करता यावा, हा या पुस्तकाचा मुख्य उद्धेश आहे. तुम्ही अधिकारी होण , तुमची स्वप्नपूर्ती होण हा प्रक्रियेचा शेवटचा बिंदू आहे. तिथपर्यंत पोहोचण्याची प्रकिया हि अभ्यासाशी संबंधित आहे म्हणून अभ्यास हा पुस्तकाचा गाभा आहे,  तेव्हा तुम्ही अभ्यासाला  Target करा पदाला नाही, अस लेखक आपल्या मनोगतात सांगतात .

Unique Academy या प्रकाशनाच हे पुस्तक असून, पुस्तकाला निवृत्त IAS मा. सुधीर ठाकरे यांची बहुमोल प्रस्तावना  आहे. मुळात स्पर्धा परीक्षेत पास किवा नापास हि संज्ञाच लागू होत नाही. त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही यशस्वी न झाल्यास स्वताला अकार्यक्षम किंवा कोणत्याही क्षेत्रासाठी लायक नाही अस न्यूनगंड मनात बाळगण्याच कारण नाही.

पढण्यापेक्षा कढलेला पाठ...म्हणजेच  ज्ञानापेक्षा अनुभवाचे बोल माणसाला जास्त परिपक्व बनवतात आणि इतरांना अशी व्यक्ती मार्गदर्शन करू शकते हे लेखकाच्या या मार्गदर्शनपर उपक्रमातून सिद्ध होते. अस पुस्तकच अवलोकन करताना मला जाणवल अस मा. सुधीर ठाकरे सांगतात.

  ‘शांततेच्या काळात जास्त घाम गाळल्यास, युद्धाच्या काळात जास्त रक्तपात होत नाही’. अस माननीय श्री. विश्वास नांगरे पाटील याचं एक सुंदर वाक्य आहे.  स्पर्धा परिक्षा जिंकण्यासाठी चिकाटी, जिद्द, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम हे गुण फार महत्वाचे आहेत. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये संयमाची कमतरता असून, त्यांना वाढीस लागून, त्याचे रूपांतर नैराश्यात होत.

संवाद या त्यांच्या सुरवातीच्या प्रकरणातच त्यांनी ... म्हणजे अगदी संवाद या शब्दाला साजेसं मुद्धेसूद लिखाण केलंय. स्वतःची ओळख, Celebrating Study, मनातून येणारा आवाज, कौटुंबिक अडी अडचणी.... या सारखे मुद्धे सुंदर पद्धतीने माडले आहेत. प्रत्येकाची योग्य वेळ येते पण योग्य वेळी येते त्यामुळे परिस्थिती आणि व्यक्ती यांचा आहे त्या स्थितीत आपण मानसिक स्तरावर स्वीकार करणे हा यशाच्या पायऱ्या चढण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक समस्येला संधी म्हणून घेण महत्वाच !

अभ्यासाचे नियोजन .... भाग १ व भाग २ अश्या दोन भागात विभागून लिहिलंय. या मध्ये परीक्षेचा अभ्यास ..नियोजन आणि वेळापत्रक कस असाव हे नमूद केलंय.अभ्यासाची नेमकी सुरवात कशी करावी, मार्गदर्शक, संदर्भ पुस्तके निवडण्याचे निकष काय असावेत, या विषयी सविस्तर चर्चा केली आहे. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेच्या प्रत्येक घटक विषयावर अभ्यासाची रणनीती, संदर्भ पुस्तकांची यादी वेगवेगळ्या प्रकरणांतून दिली आहे.विविध विषयांतील घटक, चालू घडामोडी करिता वर्तमानपत्राचे वाचन, त्याचे नियोजन, नोंदी ठेवणे या बाबींचे विशेष महत्वही त्यांनी या लेखात सांगितले आहे.

स्पर्धा परिक्षेची तयारी करताना त्याचा अभ्यासक्रम, गणित, इंग्रजी, बुद्धीमत्ता, विज्ञान, चालू घडामोडी या विषयांची तयारी करणे महत्वपूर्ण आहे. officers views पाठात प्रत्येक प्रकरणातील विश्लेषण अत्यंत रसरशीत आणि उपयुक्त आहे, यात वाद नाही.On- Off च महत्व या प्रकरणात .... काय करावे ? तर की करू नये .... हा गाभा आहे. पुस्तकाची पानं उघडा आणि TV च बटन बंद करा !!

अभ्यास कसा करावा ?काय करावा? कशातून करावा? अभ्यास करताना काय काळजी घ्यावी अशा काही पायाभूत प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या सोबतच Result लागण्यापूर्वी आणि Result लागल्यानंतर हे करा किवा हे करू नका ... मुलाखतीच्या दिवशी हे करा .. हे टाळा हे देखील अगदी सुंदररित्या सांगितलं आहे.

शेवटी जाता जाता लेखकांनी या पुस्तकात लिहिलेल्या काही प्रेरणादायी ओळी-

लेखक अस म्हणतात ...

कोणाच्या आयुष्यात काय लिहिलंय हे कोणाला माहित नाही. निसर्गाने बुद्धिमत्ता हि कोणाची खाजगी मालमत्ता ठेवलेली नाही. तुम्हीही अधिकारी होऊ शकता त्यामुळे तुम्ही तुमचे १००% प्रयत्न करा.

कोई भी लक्ष मनुष्य के साहस से बडा नहि ,

हर वही जो लडा नही

या ओळींप्रमाणे.... जीवाची बाजी लावून लढा. YOU DO YOUR BEST !

अभ्यासाची सुरुवात शून्यातून करणाऱ्या कोणत्याही उमेदवारासाठी हे  निश्चितच उपयुक्त आणि उत्तम पुस्तक आहे. नक्की वाचा .... अभ्यास ते अधिकारी!!

 

 

What's Your Reaction?

like
12
dislike
0
love
6
funny
0
angry
0
sad
0
wow
5