तु आधी का मी ?

तु आधी की मी आधी
उत्तर नाही माझ्याकडे 
पण इतक नक्की की,
तुझ्याशिवाय मी नाही 
आणि माझ्याशिवाय तु नाही.
तु आहेस म्हणून मी आहे, 
तुझा स्पर्श आहे म्हणून
माझ्या गाली हर्ष आहे 
तुझी नजर आहे म्हणून
माझ सौंदर्य आहे.
तुझ चिडण आहे म्हणून
माझ लटके रुसण आहे 
तुझा आधार आहे म्हणून
मी स्वच्छंद आहे.
तु समजुतदार आहेस 
म्हणून मी रागीट आहे.
तु शांत आहेस म्हणून
मी चंचल आहे,
तु माझा आहेस म्हणून
मी तुझी आहे.
तु आधी की मी आधी
उत्तर नाही माझ्याकडे 
पण इतक नक्की की,
तुझ्याशिवाय मी नाही 
आणि माझ्याशिवाय तु नाही....


            - ll सायली.बा.खैरनार ll

What's Your Reaction?

like
3
dislike
0
love
6
funny
0
angry
0
sad
0
wow
4