तु...

तु...

तु....

तु आणि तुझपण
तु दिलेला नवीन जन्म
तु दिलेला वंशाचा दिवा
तु दिलेली वंशाची पणती
तु जपलेला घरचा मान
तु निभावलेली सगळी सप्तपदी
तु जपलेला तुझं अस्तित्व
तु लढलेली तुझी प्रत्येक लढाई
तु सामोरी गेलेली ते अगणित प्रसंग
तु दिलेला आधारमय मायेचा स्पर्श
तु जगलेली स्वता:च मन मारुन
तु अडकलेली बंधनांच्या बेडीत 
तु नव्याने जगलेली तुझी स्वप्न 
तु आणि तुझ अस्तित्व 
तु आणि तुझी कधी ही न संपलेली जगासोबतची अजिंक्य लढाई..........
     

- || सायली बा. खैरनार ||

What's Your Reaction?

like
7
dislike
0
love
1
funny
0
angry
0
sad
0
wow
2