प्रयोजनांचा निखारा

प्रयोजनांचा निखारा फुंकर घातल्या जळता जळत नव्हता, राख मात्र होत होती स्वप्ने, कोणती ती कुणास ठाऊक..

ईयत्ता सरली की प्रश्नही अवघड होत जातात... म्हंटले तर,
आयुष्य सरल्यावरती मात्र सगळेच निरर्थक वाटते..
प्रश्न.. उत्तरे.. उत्तरांपेक्षा प्रश्नच...नी त्यापेक्षा प्रश्न विचारणारा,
कदाचित प्रश्नच इतके सोप्पे होते की कोणी त्यांची उत्तरे लिहिलीच नाहीत,
कदाचित कोणाला कळलेच नाहीत ते...
मीही एक प्रवासी ज्याचा,
प्रवास चालू होता, दिशा कुठलीच नव्हती..
होते फक्त मोकळे आकाश..
कधी धूसर रस्ता नी दाट धुके,
कधी वादळवारा - आभास कुठे,
कधी पावसानंतर उन सावलीचा गंध कुठे..
कधी जुन्या आठवणी, जुन्या वाटा, जुनी स्वप्ने
ओळखीचा अनोळखी मी जुना जुना..
कधी (बहुदा) नकोसा,
अनुभवी जाणता मी नवा, नव्या स्वप्नातला..
कधी प्रवासी-वाटसरू मी,
गर्दीतला एक साधासा,
कधी पहारेकरी मी माझा, माझ्याच रस्त्यातला..
प्रयोजनांचा निखारा फुंकर घातल्या जळता जळत नव्हता,
राख मात्र होत होती स्वप्ने,
कोणती ती कुणास ठाऊक..

What's Your Reaction?

like
3
dislike
0
love
4
funny
0
angry
0
sad
0
wow
1