पुतीन प्रवृत्ती || Putin's tendency

गेल्या 20 वर्षाच्या काळात भारताने तीन पंतप्रधान पाहिले.. अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग व नरेंद्र मोदी.. अमेरिकेने सुद्धा बिल क्विंटन,जॉज बुश, बराक ओबामा व सध्याचे डोनाल्ड ट्रम्प हे चार राष्ट्राध्यक्ष पाहिले आहेत

पुतीन प्रवृत्ती || Putin's tendency

गेल्या 20 वर्षाच्या काळात भारताने तीन पंतप्रधान पाहिले.. अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग व नरेंद्र मोदी.. अमेरिकेने सुद्धा बिल क्विंटन,जॉज बुश, बराक ओबामा व सध्याचे डोनाल्ड ट्रम्प हे चार राष्ट्राध्यक्ष पाहिले आहेत.. पण रशियामध्ये परिस्थिती थोडी भिन्न आहे..स्वातंत्र्यानंतरचा भारताचा जवळचा मित्र रशियाच्या सर्वोच्चपदी गेल्या 20 वर्षापासून(2018 च्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीच्या निकालानुसार 2024 पर्यंत)रशियाचा आधुनिक राजा(झार) ब्लादिमिर पुतिन हीच व्यक्ती दिसून येत आहे..
आपल्याला असा प्रश्न पडला असेल की गेल्या 2 दशकापासून पुतीन आपले सर्वोच्च पद कश्या प्रकारे अबाधीत राखू शकले? पुतीन असे कसे करू शकले, हे आपण पाहूयात..

गुप्तहेर कथा,गुप्तहेर अधिकारी ते राजकीय नोकरशहा
 ही कथा अश्या एका रशियन तरुणाची आहे.. ज्यांने गुप्तहेराच्या कथानकातुन प्रेरित होऊन रशियातील त्यावेळेसच्या सर्वोच्च गुप्तहेर संस्थेत म्हणजेच केजीबीमध्ये कशाप्रकारे सामील होता येईल ह्याची चौकशी करायला जातो.. त्या वेळेस केजीबीमधील एक अधिकारी पुतिनला केजीबीमध्ये सहभागी होण्याचे दोन मार्ग सांगतो..
एक तर सैन्यात सामील हो.. किंवा स्वतचे पदवीचे शिक्षण पूर्ण करून तू  सामील होऊ शकतो..
त्यानुसार पुतीन स्वतचे अगोदर कायद्याचे शिक्षण पूर्ण करतो.. आणि 1980 च्या दरम्यान पुतीन हे केजीबीमध्ये सामील होतात सुरुवातिला काही काळ माँस्कोमध्ये केजीबीच्या मुख्य कार्यालयात काम केल्यानंतर त्याची बदली ही पूर्व बर्लिनमध्ये होते..
हा काळ सोव्हिएत रशियाच्या विघटनाचा काळ होता..
9 नोव्हेंबर 1989 साली बर्लिनची भिंत कोसळली जात असताना पुतिन पूर्व बर्लिनमध्ये होता.. ह्या घटनेचा पुतीनला अत्यंत राग आलेला होता..
पुढे कालांतराने पुतीनने केजीबीची नोकरी सोडून रशियातील राजकीय नोकरशाहीत प्रवेश केला..
राजकीय नोकरशाहीत प्रवेश केल्यानंतर पुतीन ह्यांची रशियातील गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.. त्यानंतर रशियाच्या सुरक्षा परिषदच्या सदस्यपदी नेमणूक झाली..पुढे माँस्को शहराच्या उपमहापौरपदी त्याची वर्णी लागली..

1991 ते 1999 चा कालखंड

पुतीन ह्यांचा राजकीय प्रवास पाहण्याअगोदर  1991 ते 1999 मधील रशियामध्ये घडणाऱ्या घटना समजून घेणे महत्त्वाचे आहे.. 1991 मध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर रशिया भोवती असणारा साम्यवादाचा पोलादी पडदा नेस्तनाबूत झाला.. या काळात रशियाच्या राजकारण व अर्थकारणावर प्रभाव पडणाऱ्या दोन घटना घडल्या..त्याची आपण माहिती घेऊया..
एकतर रशियाच्या अध्यक्षपदी बोरिस येेल्ट्सन विराजमान झाले..
येल्ट्सन ज्याच्या कालखंडाच्या सुरुवातीला रशियामध्ये मोठया प्रमाणात बेरोजगारी,महागाई,अर्थव्यवस्थेची ढासळण झाली होती.. त्यामुळे येल्ट्सन ह्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे सहकार्य मागितले..आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून रशियाला रशियाची बाजारपेठ मुक्त करण्यासाठी काही जाचक अटी घालून देण्यात आल्या..
त्यामधून रशियामध्ये असलेले रशियन उद्योगधंदे आणि कंपन्या ह्या  रशियामधील मूठभर लोकांमध्ये वाटप केल्या गेल्याहोत्या.. त्यामधून रशियामध्ये भांडवलशाहीचा नवीन प्रकार उदयाला आला.. त्याला कुडमुडी भांडवलशाही असे म्हटले गेले..
ह्या कुडमुडी भांडवलशाहीचे नवीन उद्योगसम्राट निर्माण झाले त्यास ओलीगार असे म्हटले गेले..
ह्या ओलिगार लोकांचे रशियाच्या उद्योग आणि व्यवसायावर नियंत्रण होते.. परिणामी रशियामध्ये ओलिगार हे पड्दयाच्या मागून रशियन साम्राज्य चालवत होते..
दुसरे महत्त्वाचे कारण असे रशिया मध्ये वाढत चाललेला सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार..
स्वतहा येल्ट्सन ह्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचारामध्ये लुप्त होते..
आणि त्यांना अशी भीती होती की  ते पायउतार झाल्यावर त्यांचावर असलेले भ्रष्टाचाराचे गुन्हे ह्याचांपासून मुक्तता तसेच त्यांचा मुलीला अभय दिले पाहिजे...
त्यामुळे त्यांना रशियाच्या अध्यक्षपदी विश्वासु माणसाला आणायचे होते.. जो त्यांना ह्या वरील दोन गोष्टीची हमी देईल..
आणि ती विश्वासु व्यक्ती त्यांना ओलिगारच्या मदतीने मिळाली होती..
त्या व्यक्तीच नाव म्हणजे ब्लादिमिर पुतिन..

पुढील भागात आपण पुतिन ह्यांने आपले सर्वोच्चपद सत्तापद गेली 20 वर्ष अबाधित कसे ठेवले.. ह्याबद्दल चर्चा करूया..


Click Here To See More

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0