महाराज उठून बसले आणि म्हणाले - ' मी जायला तयार आहे. डर कुछ नहीं, सबको सलाम बोलो. ' 

६ मे १९२२ ला शाहू महाराजांनी जगाचा निरोप घेतला. राजांच्या मृत्यूच्या बातमीने लोकांच्या दुःखाला पारावार उरला नाही. प्रबोधनकार ठाकरे ' प्रबोधन ' मध्ये लिहतात की , ' शाहू महाराजांच्या मृत्यूने एक पट्टीचा राजकारणी, मुत्सद्दी, खंबीर समाजसुधारक, धैर्यवान , धर्म क्रांतिकारक, सक्रीय अस्पृश्यांचे उद्धारक, जगप्रसिद्ध पैलवान, निधड्या छातीचा शिकारी, राष्ट्रीय पक्षांच्या कारस्थानी मार्गातला काटा, आणि दीन दुनियेच्या भवितव्यावर प्रकाश पाडणारा सर्चलाईट नाहीसा झाला. ' 

महाराज उठून बसले आणि म्हणाले - ' मी जायला तयार आहे. डर कुछ नहीं, सबको सलाम बोलो. ' 

लोक कल्याणकारी राजा म्हणजे काय याचा प्रत्यय शाहू राजांच्या आदेशावरून येतो. ' रयतेच्या भाजीच्या देठाला ही हात लावू नये ' असे शिवछत्रपतींच्या राज्यकारभाराच्या धोरणाचे आदर्श शाहू महाराजांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते. राजा झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसांनी महाराजांनी काढलेल्या या आदेशावरून पहावयास मिळते. महाराज शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडले की संस्थांनी नोकर रयतेकडून बरेच जिन्नस विनामूल्य घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर रयतेवर अन्याय होऊ नये म्हणून महाराजांनी आदेे जारी केला

' अनुभवांती असे दिसून आले की, श्रीमहाराज सरकारची स्वारी खुद्द स्वारी इलाखे मजकुरी शिकरीकरता होते तेव्हा ज्या पेट्याचे हद्दीत मुक्काम पडतो त्या पेटयाचे मामलेदार त्या पेट्याचे फौजदारास सरबराई ठेवण्या बद्दल हुकुम करतात. फौजदार आपले ताब्यातील पोलिसांकडे हे काम सोपवतात. मग ते पोलीस सभोवराचे खेड्यापाड्यात जाऊन एके ठिकाणी बकरी, दुसरे ठिकाणी अंडी, कोंबडी वैगेरे जे जिन्नस सापडेल तो घेतात. हुजुरचे स्वारीचां त्या तालुक्यातून कूच होण्याचे वक्ती स्वारी बरोबर जे खाजगी खात्यातील कारकून कामगिरीवर असतो तो मामलेदार याजकडून. हिशोब घेतो आणि पोहचल्या जिन्नसाबद्दल  पैसा अदा करतो. नंतर तो पैसा मामलेदार फौजदाराकडे, फौजदार आपल्या शिपायाकडे,   शिपाई गावाच्या पाटलाकडे आणि पाटील ज्या इसमाकडूंन जिन्नस घेतले त्या इसमास अदा करतात असा काल्पनिक समज आहे. परंतु ज्या गोर गरीबांकडून जिन्नस घेण्यात येतात, त्या इसमास तो सर्व किंवा त्यातील काहीतरी पैसा पोहचतो किंवा कसे याबद्दल वानवा वाटतो. असे होऊ नये व ज्या गोर - गरिबांचा माल घेतला त्यास भरपूर पैसा व आपल्या स्वारीच्या निमित्ताने कोणास उपसर्ग यत्किंचितही होऊ नये, अशी खुद्द श्रीमहाराजांची इच्छा आहे. '

महाराज शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडले की संस्थांनी नोकर रयतेकडून बरेच जिन्नस विनामूल्य घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर रयतेवर अन्याय होऊ नये म्हणून महाराजांनी आदेेश जारी केला

शाहू महाराजांना सन १९१२ पासून मधुमेह आणि हृदय विकाराचा त्रास होत होता. ५ मे १९२२ पासून महाराजांना वेदना होत होत्या. महाराजांनी प्रबोधनकार ठाकरे यांना बोलावून सातारचा इतिहास लिहण्यास सांगितले. मुंबईच्या पन्हाळा लॉज मध्ये महाराज अस्वस्थ होऊन पडले होते. जवळच इंदुमती राणीसाहेब, बाबासाहेब खानविलकर, बापूसाहेब महाराज ही जीवाभावाची मंडळी बसली होती. शाहू महाराजांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. महाराज उठून बसले आणि म्हणाले - ' मी जायला तयार आहे. डर कुछ नहीं, सबको सलाम बोलो. ' 

६ मे १९२२ ला शाहू महाराजांनी जगाचा निरोप घेतला. राजांच्या मृत्यूच्या बातमीने लोकांच्या दुःखाला पारावार उरला नाही. प्रबोधनकार ठाकरे              ' प्रबोधन ' मध्ये लिहतात की , ' शाहू महाराजांच्या मृत्यूने एक पट्टीचा राजकारणी, मुत्सद्दी, खंबीर समाजसुधारक, धैर्यवान , धर्म क्रांतिकारक, सक्रीय अस्पृश्यांचे उद्धारक, जगप्रसिद्ध पैलवान, निधड्या छातीचा शिकारी, राष्ट्रीय पक्षांच्या कारस्थानी मार्गातला काटा, आणि दीन दुनियेच्या भवितव्यावर प्रकाश पाडणारा सर्चलाईट नाहीसा झाला. '

संदर्भ : 

राजर्षी शाहू छत्रपती जीवन व शिक्षणकार्य : प्राचार्य रा. तु. भगत, रिया पब्लिकेशन, कोल्हापूर, ऑक्टोबर २०११. 

..........................

विविध संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभा - समारंभात कधी अध्यक्ष म्हणून तर कधी उद्घाटक किंवा मुख्य पाहुणे म्हणून शाहू राजांनी जी भाषणे केली आहेत त्याचा संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले,

'क्रांतीसुक्ते : राजर्षी छत्रपती शाहू '  पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर भेट द्या.

https://sahitya.marathi.gov.in/scans/Krantisutre%20Rajshree%20Chatrapati%20Shahoo_0118.pdf

What's Your Reaction?

like
5
dislike
0
love
1
funny
0
angry
0
sad
0
wow
1