दिलवालो की दिल्ली || Dilwale Ki Delhi

दिल्ली शहराची ओळख ही आपल्या सर्वासाठी भारत देशाची राजधानी, 26 जानेवारी रोजी होणारा प्रजासत्ताक दिवसाचा सोहळा असो किंवा 15 ऑगस्ट या दिवशी लाल किल्लाच्या शाही थाट,  2011 साली झालेले  दिल्लीतील India against corruption आंदोलन असो किंवा दिल्ली शहरातील  मेट्रोसेवा ..

दिलवालो की दिल्ली || Dilwale Ki Delhi

दिलवालो की दिल्ली

✍????प्रथमेश वैशाली गंगाराम पानवलकर✍????


दिल्ली शहराची ओळख ही आपल्या सर्वासाठी भारत देशाची राजधानी,
26 जानेवारी रोजी होणारा प्रजासत्ताक दिवसाचा सोहळा असो किंवा 15 ऑगस्ट या दिवशी लाल किल्लाच्या शाही थाट, 
2011 साली झालेले  दिल्लीतील India against corruption आंदोलन असो किंवा
दिल्ली शहरातील  मेट्रोसेवा ..
  
आपल्या काहींच्या मनात देखील दिल्लीबदल अजून काही वेगळ्या कल्पना असतील??
आज मी तुम्हाला नव्याने दिल्ली शहराची ओळख करून देणार आहे

काही इतिहासकाराच्या मते दिल्ली शहर हिंदुस्थानाची सीमारेषा असल्यामुळे मूळ हिंदीतील शब्द देहलीजचा अपभ्रंश पुढे जाऊन दिल्ली झालेला दिसून येतो..

पुराणिक कथांमध्ये महाभारतापासून दिल्ली शहराचे अस्तित्व आढळून येते..महाभारतात दिल्लीचे प्राचीन नाव हे इंद्रप्रस्थ असे होते.. पांडवाने हे शहर वसवले आहे.. अश्या काही कथा महाभारतात आहेत..
  
महाराज पृथ्वीराज चौहान ह्याचा दरबारातील एका कवीच्या हिंदी रचना पृथ्वीराज रासो नुसार
(तोमर घराणे इ.स900-1200) तोमर  राजा अनंगपाल हे दिल्ली शहराचे संस्थापक मानले जातात..

त्यानंतर महाराज पृथ्वीराज चौहान हे दिल्लीमधील शेवटचे हिंदू राजा मानले जातात..

 1206मध्ये दिल्ली शहर हे दिल्ली सल्तनतची राजधानी झालेली दिसून येते..
ह्या दरम्यानच्या काळात 
दिल्ली शहरावर खिलजी वंश, तुघलक वंश,सैयद वंश,लोधी वंश ह्या घराण्यानी दिल्ली शहरावर राज्य केलं..
त्यानंतर मुघलांनी दिल्ली शहरावर राज्य केलं..
असे म्हणतात की आधुनिक दिल्ली शहराची निर्मिती होण्याअगोदर दिल्ली शहर हे सात वेळा नष्ट होऊन पुन्हा नव्याने दिल्ली शहराची निमिर्ती करण्यात आली होती...

स्वतंत्र पूर्व काळात दिल्ली शहर हे 1911 पासून ब्रिटिश भारताची राजधानी आहे..
स्वतंत्रानंतर सुद्धा दिल्ली शहराला राजधानीचा दर्जा देण्यात आला.
1952 साली दिल्ली राज्याचा दर्जा देण्यात आला होता.. राज्य असल्यामुळे दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका सुद्धा पार पडल्या होत्या..
पण पुढे 1956 मध्ये पुन्हा एकदा दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनवले गेले..
त्यानंतर 1993 मध्ये संविधानांत 69वी घटनादुरुस्ती करून दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र घोषित केले गेले..

दिल्ली शहर हे प्रामुख्याने जुनी दिल्ली आणि न्यू दिल्ली म्हून ओळखले जाते..
जुनी दिल्ली ही जुन्या मस्जिदी,
जुने किल्ले,
स्मारकं ह्यांनी नटलेली आहे..
जुनी दिल्ली शहर हे मोघल आणि मुस्लिम शासनकाळातील वैभव दर्शवताना दिसून येते..
शानदार लाल किल्ला
ऐतिहासिक चांदणी चौक
राजघाट आणि शांतीवन ही जुन्यातील दिल्लीची वैशिष्ट्ये आहेत..
 राजघाट आणि शांतीवनचे निर्माण 1946 नंतर स्वतंत्र भारतात झाले आहे..

तर दुसरीकडे आधुनिक दिल्ली हे शहर आहे.. ज्याची निर्मिती एडविन लुूटीनस(नवीन दिल्ली परिसराला लुटीनस दिल्ली असे म्हून संबोधले जाते)आणि हर्बड बेकिंग ह्यांनी केली होती..
ह्या भागात सरकारी कार्यालये अति महत्त्वाच्या व्यक्तीचे निवासस्थाने,
विविध देशाचे दूतावास आहेत..

दिल्ली शहरामध्ये प्रामुख्याने पंजाबी,हरयाणी,मुस्लिम,जाट,
गुजर,पूर्वाचली(उत्तर प्रदेश&बिहार मधील लोकांना दिल्लीमध्ये पूर्वाचली म्हणतात)

दिल्लीमध्ये हिंदी,इंग्लिश,पंजाबी,उर्दू भाषा मोठया प्रमाणात बोलल्या जातात..

दिल्लीमध्ये रमजान,मकरसंक्रांत,प्रजासत्ताक दिवस,होळी,
रंगपंचमी,बुद्धपूर्णिमा,दिवाळी,
दसरा,गुरुनानक पूर्णिमा हे सर्व सण मोठ्या थाटात साजरे केले जातात..

दिल्ली एक महानगर असल्यामुळे  दिल्लीमधील विविध धर्म एकत्ररित्या शांत आणि सुखी जीवन जगताना दिसून येतात..

दिल्ली शहर हे उत्तर भारतातील एक व्यसायिक आणि व्यापारी केंद्र मानले जाते..
दिल्ली शहरामध्ये सरकारी क्षेत्राला नोकरीचे मुख्य स्रोत मानले जाते..
दिल्ली शहर हे एक नोकरपेशा शहर आहे.. दिल्ली मध्ये इजिनीनेअरिग,आयटी क्षेत्र,कपडे रसायनक्षेत्र इ क्षेत्र उद्योग आणि नोकरीसाठी महत्वाचे क्षेत्र मानले जातात..
एका सॉफ्टवेअर कंपनीच्या सर्वेक्षणानुसार दिल्ली शहर हे भारतातील एक प्रमुख सॉफ्टवेअर निर्यातक आहे..

दिल्ली शहर हे संपूर्ण भारताशी रस्ते आणि महामार्ग,रेल्वे आणि हवाईमाग्राने जोडले गेले आहे..

दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे दिल्लीमध्ये काही समस्या सुद्धा दिसून येतात..
दिल्लीमध्ये ट्रॅफिक मोठया प्रमाणात आढळून येते.. ह्या ट्रॅफिकमुळे दिवसेंदिवस दिल्लीचे प्रदूषणात सुद्धा वाढ होताना दिसून येते आहे..
त्यासोबत पाणी,वीज,अनधिकृत बांधकाम ह्यासुद्धा समस्या दिल्लीमध्ये दिसून येतात..
  
  वरील लेखामध्ये आज आपण दिल्ली शहराबदल माहिती घेतली आहे..


Click Here To See More

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0