एक सर्वसामान्य नोकरशहा ते राष्ट्राध्यक्ष

एक सर्वसामान्य नोकरशहा ते राष्ट्राध्यक्ष .. ते सुद्धा रशिया सारख्या बलाढ्य देशांचा. राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन कसा झाला ?? आणि त्या ही पुढे रशियातील सत्ता स्वतःकडे तब्बल 20 वर्षे कशी टिकवून ठेवली याबद्दलचे विवेचन आपण आजच्या लेखात करूया.

एक सर्वसामान्य नोकरशहा ते राष्ट्राध्यक्ष

पुतिन प्रवृत्ती 
एक सर्वसामान्य नोकरशहा ते राष्ट्राध्यक्ष ..
ते सुद्धा रशिया सारख्या बलाढ्य देशांचा. राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन कसा झाला ?? आणि त्या ही पुढे रशियातील सत्ता स्वतःकडे तब्बल 20 वर्षे कशी टिकवून ठेवली याबद्दलचे विवेचन आपण आजच्या लेखात करूया. 
मागील लेखात सुरुवातीला आपण पुतिन यांचा एक गुप्तहेर ते राजकीय नोकरशहा हा प्रवास पाहिला. त्यानंतर 1991 ते 1999 दरम्यान रशियातील काही घडामोडींवर सुद्धा धावती नजर मारली. या काळात पुतिन यांनी ओलिगार यांच्या समोर विश्वासू आणि निष्ठावंत अशी प्रतिमा तयार केली. या प्रतिमेचा पुतिन यांना दिवसेंदिवस विविध महत्वाच्या पदांवर वर्णी लागून फायदा होत होता. पुतिन हे ओलिगार मधील उद्योजकांचे निकटवर्ती झाले होते. 
ओलिगार यांच्या सहकार्याने ऑगस्टमध्ये पुतिन यांची नेमणूक रशियाच्या पंतप्रधानपदी झाली आणि काही महिन्यांतच त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुद्धा शपथ घेतली.
⚡मॉस्को साखळी बॉम्बस्फोट⚡
          ऑगस्ट 1999 ची घटना. रशिया मधील मॉस्को शहरात साखळी बॉम्बस्फोटची घटना घडते. ह्या साखळी बॉम्बस्फोटात 300 हुन अधिक लोकांचे प्राण गेले. हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागे चेचेन्याचा  दहशतवाद्यांचा हात असू शकतो. असा संभ्रम तयार करण्यात आला. ( मुळात हा दहशतवादी हल्ला पूर्वनियोजित होता. यामागे केजीबीतील काही गुप्तहेरांचा हात होता.) 
हल्ला घडला तेव्हा पुतिन रशियाचे पंतप्रधान होते. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन एक विधान केले. 
" चेचेन्यातील दहशतवादी हे कुत्रे आहेत आणि आम्ही या कुत्र्यांना ठेचून ठेचून मारू. "
पुतिन यांचा हा अंदाज त्यावेळेस रशियन जनतेला भावला. त्यावेळेपासून पुतिन यांची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढू लागली. एका टीव्ही चॅनेलच्या पाहणीनुसार सप्टेंबर 1999 रोजी पुतिन यांची लोकप्रियता ही 2% होती. ती पुढे वाढून फेब्रुवारी 2000 मध्ये 45% झाली. लोकप्रिय नेता म्हणून पुतिन उदयास आले. 
⚡पुतिन यांचा एककेंद्री कार्यकाळ⚡
          31 डिसेंबर 1999. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ओलिगार यांच्या माध्यमातून रशियामध्ये सत्तांतर झाले. बोरिस येलतसन   
यांच्या जागी ब्लादिमिर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. 
पुतिन सत्तारूढ झाल्यानंतर त्यांनी रशियातील सर्व प्रांतातील गव्हरनर्सना त्यांनी पदच्युत केले. आणि त्याजागी नवीन गव्हरनर्स ची नियुक्ती केली. या घटना क्रमामधून रशियामध्ये पुतिन यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. अशा प्रकारे लोकनियुक्त गव्हरनर्सना पदच्युत करणे हे असंवैधानिक आहे. पण पुतिन यांनी हा सर्व विरोध मोडीत काढून पुतिन यांच्या कार्यकाळात रशियन राज्यव्यवस्था ही एकचालकानुवर्ती असेल हे या घटनेद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला. 
पुतिन यांनी रशियन जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी राष्ट्रवाद आणि सोव्हिएत काळातील रशियाचे महासत्तेचे वैभव परत आणण्यासाठी देखील प्रयत्न केले. 
मॉस्को मधील थिएटरकांड ही अशीच एक घटना आहे. ज्यामुळे पुतिन यांनी दहशतवाद्यांबद्दल कडक कारवाईचा संदेश दिला. 
मॉस्कोमध्ये काही चेचन्या पुरस्कृत दाहशतवाद्यांनी एक संपूर्ण थिएटर जवळपास 500 हुन अधिक लोक चित्रपट पाहत असताना आपल्या ताब्यात घेतले.  या दहशतवाद्यांचे सरकारकडे असे मागणे होते की चेचन्याला स्वातंत्र्य द्या. त्याबदल्यात आम्ही तुमच्या नागरिकांची सुटका करतो. त्यावर रशिया सरकारचे असे म्हणणे होते की तुम्ही आमच्या नागरिकांना तुमच्या ताब्यातून सोडवा. आम्ही तुमचे प्राण घेणार नाहीत. जवळपास 48 तास सुरू असलेल्या नाटकीय घडामोडीनंतर रशियन सरकारने (A/C) वातानुकूलित यंत्राच्या नलिकेच्या सहाय्याने विषारी वायू सोडले. त्यामुळे दहशतवाद्यांबरोबरच काही रशियन नागरिक सुद्धा यामध्ये मारले गेले. पुतिन यांचा रशियन जनतेला कडक संदेश होता की दहशतवाद्यांसमोर आम्ही आमच्या नागरिकांना सुद्धा शह देणार नाही. 
पुतिन यांनी सिरिया आणि युक्रेन मध्ये केलेला हस्तक्षेप सुद्धा रशियन जनतेला भावला. कारण या हस्तक्षेपामुळे रशियन जनतेमध्ये असा संदेश गेला की रशिया ही पुन्हा महासत्ता म्हणून उदयास येत आहे.
पुतिन सत्तेमध्ये टिकून राहण्याचे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय राहण्यामागची अजून काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 
⚡ अमेरिका - इराक युद्धामुळे तेलाच्या वाढणाऱ्या किंमती ⚡
          तेलसाठ्यांसाठी रशिया जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरीही रशिया जगातील तेल निर्यातक संघटनेचा सदस्य आजतागायत नाही आहे. याच तेलसाठ्याचा फायदा रशियाला अमेरिका- इराक युद्धाच्या वेळेस झाला. या युद्धामुळे तेलाचे भाव फार मोठ्या प्रमाणात गगनचुंबीरित्या वाढले. परिणामी रशियन जनतेच्या हाती अतिरिक्त पेसा आला. या अतिरिक्त पैशामुळे रशियन जनतेने पुतिन यांच्या एककेंद्री सत्तेकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. 
पुतिन यांच्या लोकप्रियतेच्या कळस गाठण्यामागे सर्वात मोठी घटना ही 2016 सालच्या अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीत पुतिन यांनी प्राप्त केले. 
2016 च्या अध्यक्ष निवडणुकीत रशियाच्या सायबर सेलने हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात काम केले. आणि डोनाल्ड ट्रम्प यांना अप्रत्यक्षपणे निवडणुकांमध्ये जिंकवून देण्यात रशियाचा किंवा पुतिन यांचा सर्वात मोठा वाटा आहे. या घटनेने रशियन जनता गर्वाने फुलली असेल. 
या घटनेची आपण आपल्या देशासोबत तुलना केल्यास ती अशी असेल की एखाद्या     भारतीय पंतप्रधानांनी जर इतर देशातील म्हणजे समजा पाकिस्तानी पंतप्रधानांना आपल्या हस्तक्षेपाने जर निवडून आणण्यास सहकार्य केले तर भारतीय असण्याच्या नात्याने आपण सुध्दा तितकाच अभिमान बाळगू. 
जानेवारी 2020 मध्ये रशियन संसदेमध्ये पुतिन 2036 पर्यंत सत्तेमध्ये राहण्यासाठी एक प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आणि हा प्रस्ताव पुढे रेटण्यात येऊ शकतो. कारण आजही पुतिन यांची संसद, न्यायव्यवस्था,प्रसारमाध्यमे आणि जनतेमध्ये सुद्धा तितकीच घट्ट पकड आहे.
● पुतिन ही व्यक्ती असून प्रवृत्ती आहे . 
● पुतिन प्रवृत्ती म्हणजे राष्ट्रवादाची झालर निर्मिती करणे, प्रसारमाध्यमे आणि यंत्रणेवर कमालीचे नियंत्रण मिळवणे, विरोधकांना पूर्णपणे शक्तीहीन करणे. 
● आज रशियामधून पुतिन प्रवृत्ती दिवसेंदिवस जगामध्ये फोफावत आहे. ही प्रवृत्ती जगातील लोकशाही देशांमध्ये पसरत आहे. याचे उदाहरण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इटलीतील पंतप्रधान, ऑस्ट्रेलियातील पंतप्रधान किंबहुना आपल्या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पुतिन प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे


Click Here To See More

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0