अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या त्रासाचे कारण बनली आहे? | | What is something that has caused you trouble?

अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या त्रासाचे कारण बनली आहे?? अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला जगायला देत नाही आहे??तुम्हाला तुमच्या माणसापासून वेगळी करते आहे??अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनातील यश आणि सुखापासून दूर नेत आहे??

अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या त्रासाचे कारण बनली आहे? | | What is something that has caused you trouble?

✍????प्रथमेश वैशाली गंगाराम पानवलकर✍????


अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या त्रासाचे कारण बनली आहे?? अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला जगायला देत नाही आहे??तुम्हाला तुमच्या माणसापासून वेगळी करते आहे??अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनातील यश आणि सुखापासून दूर नेत आहे??
ही गोष्ट आहे ताणतणाव
ह्या ताणतणावाखाली आपण आपले संपूर्ण आयुष्य हे चिंतेच्या छायेखाली घालवणार आहोत की  शांत आणि समाधानपूर्ण आयुष्य आपल्याला जगायला आवडेल??
डेन कॅर्निगी ह्यांचे हाऊ टू स्टॉप वररिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या पुस्तकांतील काही किस्साच्या माध्यमातून आपण आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणावाला सुट्टी कशी देता येईल ह्यांची उहापोह करणार आहोत...
त्याअगोदर आपण आपल्या दोन सवयी बद्दल माहिती करून घेऊया एक म्हणजेच भूतकाळातील झालेल्या चुकावर सतत विचार करणे आणि दुसरी सवय म्हणजे भविष्याचा अतिविचार करणे
ह्या दोन सवयीमुळे आपण वर्तमानकाळात जगणे विसरून जात आहोत...
तुम्हाला असे खरोखर वाटते का तूम्ही तुमच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहात का??नसेल तर तुम्हाला तुमच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यास आवडेल का?? खालील किस्सा मार्फत आपण असे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूया..

   वसंत ऋतुच्या एका रम्य संध्याकाळी एक वैद्यकीय शाखेतील मुलगा अभ्यास करता करता आपल्या भविष्याबद्दल विचार करत होता की मी शेवटच्या वर्षी वैद्यकीय परीक्षा पास होईन की नाही?? कॉलेज संपले की पुढील शिक्षणाला ऍडमिशन घेऊ की जॉब करू??ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना त्यांचे लक्ष त्याचा पुस्तकावर गेले जे पुस्तक तो वाचत होता..त्या पुस्तकातील असे 21 शब्द वाचून तो प्रेरित झाला...
आणि येणाऱ्या काळात तो विद्यार्थी आपल्या काळातील सर्वात यशस्वी डॉक्टर झाला...
होय त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध जॉन हाफकीन वैद्यकीय कॉलेजचे नेतृत्व केले आणि पुढे जाऊन तो विद्यार्थी ऑक्सफर्ड विद्यापीठाचा सन्मानीय शिक्षक पण बनला..तो तरुण मुलगा दुसरा कोणी नसून सर विल्यम ओसीयर हे होते..
ते 21 शब्द सर विल्यम जे वाचले होते ते असेे होते..
लांबलचक लांब अंधुकपणे बघणे हे आपले काम नाही आहे.. तर आपल्या हातात जे  आहे ते पाहणे आपले काम आहे
वरील वाक्याचा मतितार्थ स्पष्टपणे असा आहे..
सध्या आपल्या हातातील कामे असो किंवा आपले जीवन जगणे असो ह्यावर आपण लक्ष केंद्रित करणे न की भविष्याबद्दल विचार करत बसणे।
येळ विद्यापीठामध्ये सर विल्यम ह्यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना एक युक्ती सांगितली होती..
ती युक्ती अशी की आपण दिवसाकाठी दिनक्रम.. म्हणजेजच आपण भूतकाळ आणि भविष्यकाळाचे दरवाजे आपण एका चावीने बंद करून टाकायचे आणि आपले पूर्ण लक्ष आजवर आणि आतावर केंद्रीत करायचे...
दिवसाकाठी दिनक्रम म्हणजे तुम्ही तुमचे आताचे काम करताना भविष्य आणि वर्तमानामध्ये घडलेल्या घटनांचा विचार न करणे..
तर आपले पूर्ण लक्ष आताचे काम  एकाग्रतेने करणे ह्यावर असले पाहिजे
जे पण आता करतो आहे ते पूर्ण तन मनाने करणे.. त्यात आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे..
बस हेच आपल्याला करायचे आहे.. मग तर आपले भविष्य उज्वल असणारच..
ते एक गाणे आहे ना.. 
 हर पल यहा जी भर जियो जो है समा कल हो ना हो

मित्रांनो वर म्हटल्याप्रमाणे येत्या 21 दिवसात आणि उर्वरित आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण दिवसाकाठी दिनक्रमाप्रमाणे जीवन जगू अशी आशा मी करतो....????????????????


Click Here To See More

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0