भारतात पहिला कॉल कोणी ? कोणाला ? अन् कधी केला होता ?

तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का ? की  भारतात मोबाइल केव्हा आला ?  पहिला कॉल कधी केला ? कोणी केला ?

भारतात पहिला कॉल कोणी ? कोणाला ? अन् कधी केला होता ?

आज अनलिमिटेड कॉलिंगचा पायंडा पाडण्याचे श्रेय जिओ कंपनीला जाते. काही  वर्षापूर्वी मुकेश अंबानी यांनी सर्विस प्रोवाइडर म्हणून जिओ नावाचे नेटवर्क लॉंच केले. सुरुवातीला मोफत कॉल आणि इंटरनेट डेटा देणाऱ्या कंपनीने भारताचा टेलिकॉमच्या इतिहासात क्रांति केली अन् लिमिटेड मध्ये असणारा भारतीय अनलिमिटेड कड़े वळला , इतका की महिन्याला १.५  जीबी वापरणारे आपण दिवसाला १.५ जीबी पुरत नाही म्हणतो अन् कॉल तर इतके अनलिमिटेड आहे की आपण बोलणे ही तितकेच लिमिटेड केेले आहे.

पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का  ? 

 की

भारतात मोबाइल केव्हा आला ?

 पहिला कॉल कधी केला ? कोणी केला ? 

आज भारतात मोबाइल यूजर्सची संख्या ही ५० करोड़च्या आसपास आहे. आज एका घरात साधारणपणे ४ जण मोबाइल वापरतात. पण मागील २५ वर्षापूर्वीची स्थिती यापेक्षा इतकी कितीं वेगळी होती माहितीये का ? 
जर आजची १० जून २०२० तारीख पकडली तर मागील २५ वर्ष म्हणजे १० जून १९९५ या तारखेला सुद्धा भारतात मोबाइल सेवा सुरु देखील झाली नव्हती.

नव्वदच्या दशकात कोणाच्या हातात मोबाइल दिसला की तो व्यक्ति श्रीमंत असल्याचे लक्षण होते आपल्या भाषेत म्हणायचे झाले तर , हायफाय लोकं !

भारतात पहिला कॉल केला गेला तो ऐतिहासिक दिवस म्हणजे , ३१ जुलै १९९५. या दिवशी पश्चिम बंगाल राज्याचे तत्कालीन मुंख्यमंत्री ज्योती बसु यांनी आपल्या कलकत्तामधील रायटर्स बिल्डिंगमधुन पहिला कॉल केला.
आणि हा कॉल केला गेला होता , दिल्लीतील संचार भवन मध्ये असलेल्या केंद्रीय संचारमंत्री सुख राम यांना.

आज शाओमी , ओप्पो , सैमसंग , लावा , रिलायंस , ऍपल , मोटोरोला , सोनी एरिक्सन इत्यादि दबदबा आहे. पण नव्वदचे दशक आणि विसावे दशक गाजवले ते नोकिया या कंपनीने. सर्वात विश्वासनीय आणि टिकाऊ मोबाइल म्हणून नोकियाने आपले वेगळे विश्व निर्माण केले होते.

आणि याच कंपनीने भारतात पहिला कॉल करायची सोय करून दिली. दरम्यान नोकियाने Nokia 2110 या हैंडसेट लॉंच केला होता. आणि याच नोकिया २११० च्या हैंडसेट वरुन ज्योती बसु आणि सुख राम यांच्यात पहिला कॉल झाला होता.

पण यात सर्विस प्रोवाइडर होते कोण ?

आतापर्यंत BSNL MTNL , LOOP , BPL , AIRTEL , IDEA , VODAFONE , TELENOR , UNINOR , JIO यासारखे नेटवर्क कंपनीने भारतात टेलीकॉम सेक्टर गाजवले आहे.

३१ जुलैचा तो पहिला फोन , मोदी टेलस्ट्रा या कंपनीने "मोबाइल नेट" नावाची मोबाइल सेवा सुरु केली आणि या सर्विसला लोंकापर्यंत पोहचवण्याचे काम केले ते नोकियाने.

आज 2G , 3G मागे पडून 4G आणि 5G नेटवर्क कड़े वाटचाल सुरु झालिये. मागील २५ वर्षात मोबाइल आणि नेटवर्क यामध्ये झालेले बदल बघता व तंत्रज्ञानमध्ये होणाऱ्या क्रांतिचा वेग बघता पुढील २५ वर्षात यात उल्लेखनीय आणि कल्पनेच्या पलिकडचे बदल होतील यात शंका नाही.

धन्यवाद !! 

© सागर आव्हाड.

What's Your Reaction?

like
9
dislike
0
love
4
funny
0
angry
0
sad
0
wow
1