पक्षांचे अंत्यसंस्कार करतं तरी कोण ?

" जो जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरणारच आहे." माणसाच्या बाबतीत लागू असणारी ही गोष्ट प्राणी-पक्षी यांनाही लागू पडते क़ा ?

पक्षांचे अंत्यसंस्कार करतं तरी कोण ?

i

प्रत्येक सजीवाचे एक जीवनचक्र असते. जन्म आणि मृत्यु या दोन टोकात संपूर्ण जीवन सजीव व्यतीत करत असतो.
असं म्हणतात की , " जो जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरणारच आहे." माणसाच्या बाबतीत लागू असणारी ही गोष्ट प्राणी-पक्षी यांनाही लागू पडते.

माणसाचा मृत्यु होतो , त्याच्या मृत शरीरावर धर्मानुसार त्यांच्या नातेवाईकाकडून अंत्यसंस्कार केले जातात.आणि जर हिच गोष्ट प्राणी-पक्षी यांना सरसकट सगळ्यांना लावली तर यांचे अंत्यसंस्कार करते तरि कोण ?

याच्या दोन बाजू आहे.


पहिली बाजू म्हणजे "Dying pattern of Birds"
ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय.

लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दीलेय की कुणीही जगात नैसर्गीक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीहि स्विकारलेले नाही.

 लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दीलिय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,
पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतित ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात. 
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जिवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समिप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गीक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. यावरुन बीशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रीय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जिवनकाल संपत आलाय. आणि ही जाणिव हौताच पक्षि आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही तो पर्यत ते वरती वरतीचचढत जातात. बीशप ची ही थेअरी मला तरी स्विकारार्ह वाटते  कारण दूसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजुनपर्यत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडुन कुठलेही खंडन झालेले नाही. ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणु शकतो की पक्षी मानवापेक्षा  उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव  होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवु शकतो की त्याने खूप जगुन झालेय,बघून झालेय आणि तो आनंदाने कसलिही खंत चिंता न बाळगता उंच उडून  शरीराचे  विघटन करुन टाकतो.न वयानूसार येणार्‍या व्याधी,न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सिमा नाही , पासपोर्ट नाही, पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्विकारणारी. आणि स्वतःच्या मृत्युची वेळ पण स्वतःच निश्चित करणारी..! 

लेखाची किंवा काॅर्क बिशप ल्युसी यांची बाजू ख़री समजली तरि आपल्यातले काही जण हे ही सांगू की , मि तर कितीं तरि चिमण्या , कावळा , कबूतर , घुबड़ , गरुड़ असे निदान नाव तरि सांगता येईल अशा पक्षांना मेलेले बघितले आहे किंवा अगदी फ़ोटोसुद्धा काढले आहेत.

पण अशी संख्या कितीं असेल ? 
बाकीचे पक्षी जातात कुठं ?

 आज भारताचा विचार केल्यास भारतात १३४६ पक्षांच्या जाती आहेत त्यातील ७८ जाती फक्त भारतात आढळतात.
यातील १०% जाती सुद्धा आपल्याला माहिती देखील नाहिये. 

त्यामुळे यातील आपली म्हणावी तशी दूसरी बाजु अशी देखील आहे.

आपण कुठेतरि चालत जातोय अन् मध्येच कधी कधी एखादया पक्ष्याला झाडाखाली मरुन पडलेला किंवा आपण राहतो त्यांच परिसरात मृतावस्थेत एखाद-दूसरा पक्षी मरुन पडलाय बघीतलेले असेल. 

एखाद्या पक्षी किंवा प्राण्याने खाऊन सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेले पक्षी आजपर्यत तरी 
क्वचित आढळतील.

जसे आकाशात उडु शकणारे पक्षी आहेत तसेच आकाशात उड़ता न येणारे पक्षी देखील आहे. मग त्यांचे देखील मृत्यु नैसर्गिक होत नसतील का ? असेही नाहिये की ते ही नकळत आकाशात झेप घेत असतील.

यातील काही गोष्टीचा विचार केल्यास आपल्या लक्षात येऊ शकते की , पक्षी आकाराने लहान असतात त्यामुळे त्यांचे विघटन लवकर होत असावे. त्यामुळे त्यांचे मृतदेह आपल्या नजरेस पडणं किंवा त्यांची दुर्गंधी नाकाला जाणवणं शक्य होत नाही.

तसेच सजीवांचे जीवनचक्र हे फ़ूड वेब - फ़ूड चैन या मानवी संकल्पनेनुसार चालते आहे. ज्यात प्रत्येक सजीव हा जगण्यासाथि किंवा उदारनिर्वाहासाठी एकमेकावर अवलंबून आहे. मग तो सजीव मृत असो किंवा जीवंत असो. त्याच अनुशंगाने प्राणी - पक्षी नष्ट होत असतील.

अजुन मागे जावुन प्राचीन इतिहासाचा विचार केल्यास काही मृत्यु एकांतात होतात जसे आपल्या माहितीत साप एकांतात कात टाकतात त्याच प्रमाणे देखील काही प्राणी-पक्षी यांचे मृत्यु होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेवटी क़ाय तर , 
पक्षांचे अंत्यसंस्कार असे काही होत नाही, 
फक्त एकच गोष्ट होते ति म्हणजे ,
जन्म आणि मृत्युच्या फेरा हा अखंड चालू असतो.

धन्यवाद !! 

© सागर आव्हाड.

What's Your Reaction?

like
3
dislike
0
love
2
funny
0
angry
0
sad
0
wow
1