लिहण्याची नवी पाटी : ग्रामोद्धार.

ग्रामोद्धारच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक संधी लिहते होण्याची... ज्या माध्यमातून तुमच्या डोक्यातले विचार टिपले जातील कागदावर आणि तिथून ते पोहचतील लोकापर्यंत.

लिहण्याची नवी पाटी : ग्रामोद्धार.

यावर्षी उन्हाळी सुट्टी लागण्या अगोदरच  कोरोनाने ढीगभर सुट्ट्या आंदन म्हणून दिल्या आहेत.  सरकारने लॉकडाऊन  करून चार भिंतीत कोंडून ठेवलय.  आपण दिवसभर मोबाईल , टेलिव्हिजन , गेम्स , वेबसीरीज  यामध्ये स्वत :ला नाइलाज म्हणून गुंतवून घेतोय. तरी  दिवस संपता संपत नाहीये आणि  या सगळ्यामधून आपला मेंदु प्रचंड विचार करतोय , बोलू पाहतोय ,  कोणाला काहीतरी सांगू पाहतोय , लिहू पाहतोय पण बाहेर कसे पडायचे या कोड्यात अडकला आहे .

असे  घाबरून जाऊ  नका लगेच , आम्ही काय म्हणतोय ते  तरी  ऐका 

तुम्हाला भरपूर लिहायचे आहे , डोक्यातल्या गोष्टी कागदावर मांडायच्या आहेत अन् त्यातून तुम्हाला तुमचे विचार लोकांपर्यंत पोहचवायचे आहेत पण सुरवात कशी करू समजत नाहिये मग गरज आहे एका उत्तम प्लॅटफॉर्मची जिथे दखल घेतली जाईल तुमच्या विचारांची.

ग्रामोद्धार तुम्हाला देत आहे , अशीच एक संधी

संधी व्यक्त व्हायची !    

संधी लिहते व्हायची !  

 संधी विचारांच्या देवाणघेवाणाची !!

ग्रामोद्धार " हे देशाच्या ग्रामीण आणि शहरी विकासाची खुली चर्चा करणारे व्यासपीठ आहे. गेली अनेक दशके देशाला भेड़सावत असणाऱ्या दारिद्र्य - आरोग्य - शिक्षण - रोजगार - पर्यावरण - सामाजिक/ आर्थिक विकास अशा समस्यांचा आतापर्यंतचा आढावा , या संबंधित सरकारी योजनांचा तुलनात्मक अभ्यास-तपशील , आवश्यक पाऊले यांचे विस्तृत विश्लेषण करण्यात येणार आहे. यातील कुठल्याही विषयाबद्दल असणारी तुमची मते , तुमचा अभ्यास , तुमचे विश्लेषण मांडा आमच्या सोबत.

आम्ही तुमचे लेख प्रकाशित करू आमच्या पोर्टल Gramodhar.com वर

 ते ही अगदी तुमच्या म्हणजेच लेखकांच्या नावासहित.

तर मग , वाट कसली बघताय ? 

आजच संपर्क करा : gramoddhar@outlook.com किंवा 

Whatsapp करा : +९१ ८८७९८२९८९९    |    +९१ ८८५००६४८३६ 

ग्रामोद्धारवर आपले लेख प्रकाशित करण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क करा.

त्यापुढील सुचना तुम्हाला कळविल्या जातील.

धन्यवाद !!!  

                             

 

What's Your Reaction?

like
5
dislike
0
love
3
funny
0
angry
0
sad
0
wow
3